परभणीत शिवसैनिक,युवासैनिक आक्रमक,गाढवांवर बंडखोर नेत्यांच्या प्रतिमा

0 78
परभणी :दि.25-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या अन्य बंडखोरांच्या निषेधार्थ  येथील शिवसेना,युवासेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शनिवार (दि.25) छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.
मध्यवस्तीतील छत्रपती शिवाजी महाराज  चौकात शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी दोन गाढवांवर बंडखोर नेते एकनाथ शिंदे व बंडखोरमंत्री गुलाबराव पाटील या दोघांच्या प्रतिमा लटकवल्या. या प्रतिमांना चप्पलाचे हार घालून दोन्हही गाढवं चौकातून मिरवली. त्या पाठोपाठ बंडखोरांचे प्रतिकात्मक पुतळे आणून त्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी शिवसेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. शिवसेना नेते डाँ. विवेक नावंदर,अतुल सरोदे, गंगाप्रसाद आनेराव, अर्जुन सामाले, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, माणिकराव पौंढे, संजय सारणीकर,प्रशांस ठाकूर, चंदू शिंदे, रवी पतंगे, शेख शब्बीर, अर्जुन सामाले, प्रल्हाद लाड,जनार्दन सोनवणे, ओमकार शहाणे, दगडू काळदाते,,प्रदीप भालेराव दीपक बारहाते, रावसाहेब रेंगे, प्रभाकर चव्हाण, अरविंद देशमुख,विजय ठाकूर ,पंढरीनाथ घुले, माणिकराव आव्हाड, काशिनाथ पांढरे, काशिनाथ काळबांडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक यावेळी आंदोलनात सहभागी होते. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
error: Content is protected !!