पुण्यात शिवसैनिक भडकले, तानाजी सावंत यांचं कार्यालय फोडलं

0 104

एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्याल शनिवारी शिवसैनिकांनी फोडले. सावंत यांच्या साखर कारखान्याच्या बोर्डालाही त्यांनी काळे फासले. यावेळी शिवसैनिकांनी सावंत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कार्यालयाच्या काचा फोडल्या
पुण्यातील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे आणि त्यांच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी मिळून शनिवारी सकाळी कात्रज परिसरातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. कात्रज परिसरात सावंत प्लाझा हे तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर साखर कारखानाचे कार्यालय आहे. त्याठिकाणी शनिवारी सकाळी कर्मचारी काम करत असताना अचानक शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन आणि घोषणाबाजी करत दाखल झाले. त्यांनी थेट तोडफोड सुरू करत कार्यालयाच्या केबीनच्या काचा फोडल्या, खुर्च्या फेकल्या, कागदपत्रे अस्ताव्यस्त केली आणि घोषणाबाजी करत ते निघून गेले.

बोर्डस काळे फासले
दरम्यान, जाताना त्यांनी भैरवनाथ शुगर साखर कारखान्याच्या कार्यालय बोर्डस काळे फासले. यावेळी कार्यालयाची तोडफोड करताना दोन शिवसैनिकांना जखमी झाली. याबाबत शिवसैनिक म्हणाले, आम्हाला दुखापत झाली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जी बंडखोरांनी दुखापत केली आहे ती मोठी आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत.

पोलिस रवाना

ही घटना घडल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस चौकीचे पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. पुण्यात तानाजी सावंत यांच्या विविध शैक्षणिक संस्थांचे कार्यालय आणि कॅम्पस आहेत. सदर ठिकाणी अद्याप पोलिसांनी कोणतीही सुरक्षाव्यवस्था पुरवलेली नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या प्रकारामुळे शिवसैनिक बंडखोर नेत्यांविरोधात आक्रमक झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

error: Content is protected !!