लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघात शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती विविध उपक्रमांनी साजरी

शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांचा पुढाकार

0 6

लोहा, प्रतिनिधी – हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

 

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची दि.२३ जानेवारी रोजी जयंती संपुर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमांनी साजरी होते. यात लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांच्या पुढाकाराने शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

 

यात लोहा येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच माळेगाव येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.

 

तसेच कंधार येथे ही शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, लोहा तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल, उपतालुकाप्रमुख परमेश्वर घोरपडे , किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर, शहर प्रमुख गजानन कराडे गुंठे, युवासेनेचे लोहा-कंधार विधानसभा अध्यक्ष बालाजी गाडेकर, माळाकोळी सर्कल प्रमुख परमेश्वर मुस्तापुरे, कंधार तालुका प्रमुख बाळासाहेब पाटील लुंगारे , यांच्या सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!