हिंगणघाटमध्ये शिवसेनेची बैठक संपन्न

0 28

‌‌हिंगणघाट दि, १४ (प्रतिनिधी)ः
 शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवक व शिवसैनिक यांची संयुक्त बैठक वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख  बाळाभाऊ राऊत तथा जिल्हाप्रमुख  अनिल  देवतारे यांच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे तथा वर्धा हिंगणघाट जिल्हा समन्वयक  डॉ. उमेश तुळसकर तथा उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे व शहर प्रमुख सतीश ढोमणे यांच्या नेतृत्वात मातोश्री महिला महाविद्यालय ,नंदोरी रोड, हिंगणघाट येथे घेण्यात आली.
बैठकीचे प्रमुख मुद्दे येणाऱ्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता पक्षांचे ध्येय- धोरण,संघटन मजबूत करणे, निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात यावा व निवडणुकीची तयारी करणे या संदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रास्ताविक माजी नगरसेवक श्रीधर कोटकर यांनी मार्गदर्शन केले तर वैद्यकीय सेलचे डॉ. आदर्श गुजर यांनी बैठकीत शिवसैनिकांना नेतृत्वाबद्दल महत्व पटवून दिले. शिवसेना तालुकाप्रमुख सतीश धोबे यांनी पक्ष संघटन मजबुती करिता प्रत्येक वार्डात आपल्या ज्या शाखा आहे ते नूतनीकरण करून पुन्हा शाखा बांधणी करावी. उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले.  डॉ. उमेश तुळसकर यांनी नगर पालीका निवडणुक लढवणार नसल्याचे जाहीर केले.
बैठकीत महिला जिल्हा संघटिका सौ. संगीताताई कडू , शहर प्रमुख सतीश ढोमणे ,युवासेना जिल्हाधिकारी अभिनंदन मनोत, उपतालुकाप्रमुख प्रकाश अणासाने ,शहर संघटक मुन्ना त्रिवेदी, युवा सेनेचे शहर प्रमुख भूषण कापकर, माजी नगरसेवक मनीष जेवढे, निताताई धोबे, माधुरीताई खडसे ,मनोज वरघणे, भास्कर ठवरे,देवेंद्र पडोळे, नारायण जाधव,संगीताताई वाघमारे, प्राची प्रसापाचखेडे,नीलिमा शंकर मोहमारे, स्वाती संजय पिंपळकर,रजनीगंधा मोहन तुमराम,प्रियंका अविनाश धोटे,रेश्मा बाकरे,ज्योती रवी रंगारी,उपशहर प्रमुख गजानन काटोले,जयकुमार रोहनकार, संजय पिंपळकर, शंकर झाडे ,लक्ष्मण बकाने ,विभाग प्रमुख -रुपेश काटकर, मोहन तुमराम,अविनाश धोटे,सचिन मुडे, शाम सातपुते ,नितीन वैद्य, महेश खडसे, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील आष्टीकर,सुरेश चौधरी,बंटी वाघमारे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!