शिवसेनेच्या वतीने हिंगणघाट शहरातील पाणी टंचाईबाबत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा

0 89

हिंगणघाट, प्रतिनिधी – शिवसेनेच्या वतीने शहरातील विविध प्रभागात उन्हाळ्यात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई बाबत प्रशासक नगरपरिषद हिंगणघाट तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले. 

सध्या हिंगणघाट शहरामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तर्फे नगरपालिकेच्या अख्त्यारित अमृत योजनेतील नवीन पाईप लाईन, नळजोडणी ,नवीन पाण्याच्या टाक्याचे ,निर्माण कार्य अजूनही सुरू असताना आपल्या प्रशासनाच्या वतीने दिनांक 12 डिसेंबर 2021 ला मोठ्या स्वरूपात नगरपरिषदेच्या खर्चाने या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. हे पाण्याशी निगडित कामे अपूर्ण अवस्थेत असतांना सुद्धा लोकार्पण का घेण्यात आले. आमच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दि: 8डिसेंबर 2021 हिंगणघाट येथील मुख्य अधिकारी यांना सुचित केले की, अपूर्ण कामे असल्याचे माहिती देऊनच लोकार्पण घेण्यात यावा जेणेकरून योजनेसंबंधी गैरसमज होऊन उद्घाटकांचा रोष ओढविल्या जाणार नाही असे पत्राद्वारे कळविण्यात आल्याचे दिसते. तरी नगर परिषद प्रशासन व सत्ताधारी भाजप यांनी दबाव टाकून लोकार्पण सोहळा घेण्यात आला. शहरातील अमृत योजनेअंतर्गत नवीन 12 पाण्याच्या टाक्याचे काम, नवीन पाईपलाईनचे काम असे करोडो रुपयाची योजनेसाठी खर्च करताना नवीन टाक्या भरण्यासाठी पाणी साठवण्याची उपायोजना (बंधारा) न करता या योजनेवर खर्च कसा काय केला? याचे स्पष्टीकरण व चौकशी करण्यात आली पाहिजे. या सर्व चुकीच्या नियोजनामुळे आज लोकांना पाणी मिळत नाही असे निदर्शनास येते. यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, 1)संत ज्ञानेश्वर वार्ड क्रमांक 3 व 4. आज संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्रमांक 5 ,6 व 16, शास्त्री वार्ड प्रभाग क्रमांक 18, इंदिरा गांधी वार्ड प्रभाग क्रमांक 19, तसेच निशान पुरा वार्ड मध्ये भोईपुरा, गोंडपुरा ,खाटीक पुरा व कोष्टी पुरा या भागातील पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नवीन पाईप लाईन, द्वारे पाणीपुरवठा केव्हा करणार याबाबत जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. वरील सर्व भागात 60 टक्के नळजोडणी केली परंतु उर्वरित भागात नळ जोडणी अजून पर्यंत केल्या गेली नाही. सध्या उन्हाळी दिवस असल्यामुळे जनता याबाबतीत मोठ्या प्रमाणात या प्रशासनाच्या कामात नाराजी व रोष व्यक्त करीत आहे.

2). आपण जर जनतेसाठी अमृत योजनेतून नवीन पाण्याच्या टाक्या, फिल्टर प्लांट इत्यादीचे लोकार्पण केले तर आज पर्यंत जनतेला पिण्याचे पाण्याची सुविधा नवीन पाईपलाईनद्वारे का देण्यात आले नाही? याचे उत्तर देणे आवश्यक आहे. या सर्व समस्येबाबत आम्ही आपल्याला दोन वेळा निवेदन देऊन या समस्येबाबत अवगत केले. परंतु नगर प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची ठोस नियोजन न करता. जी परिस्थिती या अगोदर होती तशीच्या तशीच आता सुद्धा आहे. यावरून असे लक्षात येते की ,आपल्याकडून शहरातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा मानस आहे. मागील नगरपरिषदेच्या भाजप सत्ताधाऱ्यांनी केलेली चूक जनतेने का भोगावी, शिवसेना खपून घेणार नाही. जर नगर प्रशासनाने सदर विषयावर दिनांक 11 एप्रिल 2022 पर्यंत तोडगा काढला नाही तर शिवसेना शहरातील जनतेचे हित लक्षात घेता उग्र आंदोलन करण्यात येईल व साखळी उपोषणाला आपल्या कार्यालया समोर बसण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

निवेदन देण्याकरिता सर्वस्वी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसारे, तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमणे, उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, उपजिल्हा महिला संघटिका सौ नलिनी सोयाम, शहर संघटक मुन्ना त्रिवेदी ,मनीष देवडे ,भास्कर ठवरे ,शंकर मोहमारे, देवेंद्र पडोळे ,महेश खडसे,युवा सेना शहर प्रमुख भूषण कापकर ,समन्वयक युवासेना प्रकाश घोडे ,जयकुमार रोहणकर, तालुका संघटिका संगीता कडू ,शहर संघटिका सौ. माधुरी खडसे ,मोहन तुमराम, अमोल मानकर ,भास्कर मानकर, रुपेश काटकर ,सचिन मुळे ,मनोज कोटकर ,दिलीप चौधरी ,नरेंद्र गुळकरी,आशिष जयस्वाल, बंटी वाघमारे ,संजय सयाम,अनिल कावडकर ,बलराज डेकाटे,हिरामण आवारी,अनिल चाफले,राजू माडेवार,सौ निर्मला मानकर, शितल चौधरी ,माधुरी काळे ,श्वेता मानकर, सौ .तडस, इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!