आळंदीत मंदिर उघडण्याच्या निर्णयाचे शिवसेनेकडून स्वागत

0 27

आळंदी, प्रतिनिधी – महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व तीर्थक्षेत्र हे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होती,गेली सहा महिने तीर्थक्षेत्र बंद असल्याने भाविकांना दर्शन घेता येत नव्हते.घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व मंदिरे कोरोना चे काटेकोर नियम पाळून उघडण्यात आले तरी आज महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र आळंदी येथील श्री.संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात त्या निमित्ताने आज आळंदी शहर शिवसेना व युवासेना यांच्यावतीने मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना मास्क वाटप केले व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान प्रमुख विश्वस्त योगेश देसाई,विश्वस्त अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर तसेच स्वराज ग्रुप चे अध्यक्ष आशिष गोगावले, शिवसेना उपशहरप्रमुख अमित डफळ, मंगेश तिताडे, युवा सेना उपशहर प्रमुख निखिल तापकीर, योगेश पंडित, तुकाराम माने उपस्थित होते.

error: Content is protected !!