धक्कादायक…. पोलिसानेच केले महाविद्यालयीन युवकावर अनैसर्गिक कृत्य

0 80

इस्लामपूर, प्रतिनिधी – महाविद्यालयीन तरुणास त्याचे प्रेम प्रकरण उघडकीस आणण्याची धमकी देत व पैशाची मागणी करत अनैसर्गिक अत्याचार (unnatural act) केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्याकडील पोलिस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर (३४रा.राजेबागेश्वर) याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली. या अनैसर्गिक कृत्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. ही घटना दि.२९ आॅक्टोबर रोजी घडली आहे.

ते म्हणाले, २७ आॅक्टोबरला पहाटे तीनच्या सुमारास पिडीत महाविद्यालयीन युवक हा आपल्या मैत्रणीला भेटून रूम निघाला होता. यावेळी इस्लामपूर पोलिस स्टेशनचे कर्मचारी हणमंत देवकर आणि आणखी एक कर्मचारी येथील रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते. पोलिस कर्मचारी देवकर याने त्याला अडवले. आता कोठून आलास ? इथे काय करतोयस ? अशी विचारणा केली. त्या युवकाने मी मैत्रिणीला भेटून आलो असल्याचे सांगितले. पोलिस देवकर याने त्या युवकांकडून त्याचा फोन नंबर घेतला.

२९ आॅक्टोबरला तो युवक ज्या महाविद्यालयात शिकत होता, त्या महाविद्यालयाच्या गेटजवळ जात देवकर याने त्या युवकास फोन करुन भेटायला येण्यास सांगितले. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास संबंधित युवक पोलिस देवकर याला भेटला. देवकर याने त्याच्याकडे पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास त्याचे प्रेम प्रकरण तुझ्या व मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी दिली. त्यावर युवकाने आपल्या मित्रांच्याकडून चार हजार रुपये उसने घेवून पोलिस देवकर याला दिले. तेवढ्यावर न थांबता देवकर याने तरुणाच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर दे, तिला माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवायला सांग असे सांगितले. संबंधीत तरुणाने ती मुलगी चांगल्या घरातील आहे असे सांगून तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर देवकर याने तु तसे न केल्यास तुझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवेन असे सांगितले. देवकर याने त्याला त्याच्या रुमवर नेले. तेथे देवकर याने त्या तरुणाशी अनैसर्गिक संबंध ठेवले व त्याची व्हीडीओ क्लिप तयार केली.

दरम्यान २१ नोव्हेंबरला दुपारी १२.३० च्या सुमारास पोलिस देवकर याने पुन्हा त्या युवकास मोबाईलवर फोन करुन महाविद्यालयाच्या गेटवर बोलावून घेतले, शारिरीक संबंधाची मागणी केली. तसे न केल्यास मोबाईलमधील क्लीप दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. संबंधीत तरुणाने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगून हवलदार देवकर याच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ हवलदार देवकर याला अटक केली आहे.

error: Content is protected !!