श्रीक्षेत्र भाऊसाहेब नगरला शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन

0 45

 

निफाड,दि 26 (प्रतिनिधी)ः
राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज जयंती उत्सव व ललित पंचमी निमित्त शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथील श्री क्षेत्र नर्मदेश्वर महादेव मंदिरात आज सोमवार (दि.२६) पासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री श्री१००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी जी महाराज यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र नर्मदेश्वर महाराज मंदिर, भाऊसाहेब नगर येथे आयोजित करण्यात आले आहे. यंदा शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह नवचंडी याग व दुर्गा सप्तशती पाठ होणार आहे.

सोमवार ( दि २६) रोजी ह भ प निवृत्ती महाराज रायते (खडक माळेगाव), मंगळवार (दि २७) रोजी भागवताचार्य ह भ प बाळू महाराज गिरगावकर, बुधवार (दि २८), ह भ प तुकाराम महाराज जेऊरकर, गुरुवार (दि २९) ह भ प बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम रात्री नऊ वाजता होणार आहे. तर शुक्रवार (दि.३०) रोजी सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. असून रात्री ८ ते ९ या वेळेत श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचे प्रवचन व रात्री ९.३० ते ११ या वेळात रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शारदीय नवरात्र उत्सव अखंड हरिनाम सप्ताह नवचंडीयाग व दुर्गा सप्तशती पाठ या सर्व कार्यक्रमांना भक्तांनी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांनी केले आहे.

error: Content is protected !!