श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाने काढली तिरंगा रॅली

0 150

परभणी,दि 12 ः
परभणी येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्त विविध कार्यक्रम घेतले जात आहेत.जिल्हा प्रशासनाकडून देखील सर्व शैक्षणीक संस्थाना हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्यानुसार श्री शिवाजी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाने तिरंगा रॅली काढुन जनजागृती करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर, प्राचार्य शाहिद ठेकिया यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख प्रा. सतीश पाईकराव, प्रा.अजय वाढवे ,प्रा.त्र्यंबक ढवळे ,प्रा.भगवान शिंदे, प्रा. विनोद पवार यांनी रॅलीचे आयोजन केले.
हर घर तिरंगा, हरमन तिरंगा, समानतेची वाहील गंगा प्रत्येक घरावर फडकू तिरंगा, एकच आमचा नारा हर घर तिरंगा, माझा तिरंगा माझी शान आदि घोषणा रॅली दरम्यान देण्यात आल्या. शहरातील वसमत रोड शिवाजी महाविद्यालय परिसर आदी भागातून रॅली काढण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
यावेळी प्रा. वीरसिंग जगताप, ग्रंथपाल संदीप चव्हाण, संजय गारकर, विष्णू बोंबले, दीपक भरोसे, सुंदर कानडे, विलास वाघमारे,ज्ञानेश्वर बारहाते आदींनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!