…..म्हणून आशिष शेलार यांना पुन्हा मिळाले मुंबई भाजपाचे अध्यक्षपद

0 20

मुंबई,दि 12 ः एकनाथ शिंदे आणि भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर, आता भाजपात संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. चंद्रकांत दादा पाटील आणि मंगल प्रभात लोढा यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आल्यानंतर, आता महाराष्ट्र प्रदेश भाजपा आणि मुंबई भाजपाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर मुंबई भाजपाचे अध्यक्षपदपुन्हा एकदा माजी शिक्षणमंत्री आणि वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार ()यांच्याकडे देण्यात आले आहे. 2017 मुंबई महापालिका निवडणुकीतही आशिष शेलार यांच्याकडेच जबाबदारी होती. त्या निवडणुकीत मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाने 33 जागांवरून तब्बल 83 जागा मिळवून घवघवीत यश संपादन केले होते. राज्यातील सत्ताबदलानंतर आता मुंबई महापालिका हे भाजपाचे पुढचे महत्त्वाचे लक्ष्य आहे, त्यासाठी आशिष शेलार यांची पुन्हा एकदा मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीआहे. कोणत्या पाच कारणांमुळे त्यांना ही संधी मिळाली हे जाणून घेऊयात.

 मुंबई महापालिकेची चांगली ओळख

आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवकपदापासून राजकारणाची सुरुवात केलेली आहे. मुंबई महापालिकेच्या कामकाजाची आणि खाचाखोचांची चांगली माहिती त्यांना आहे. मुंबई महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक, भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेत भाजपा नगरसेवकांचे गटनेते, सुधार समितीचे अध्यक्षपद भू्षविले आहे, एमएमआरडीए, मुंबई मेट्रो याचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यानंचर सलग दोन वेळा त्यांनी वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून आमदारकीही जिंकलेली आहे.

शिवसेनेला रोखू शकणारा मराठी नेता

आशिष शेलार यांच्या रुपाने मराठी नेता, मराठा नेता मुंबई भाजपाचा चेहरा म्हणून उभा करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. शिवसेनेला थेट अंगावर घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांमध्ये आशिष शेलार यांचा समावेश होतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. तसेच शेवटच्या क्षणी पक्षासाठी आवश्यक फोडाफोडी करण्याची तयारी असलेला नेता अशीही त्यांची ओळख आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी हे सर्वांना दिसलेही होते. त्यामुळेच आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ही मुंबई महापालिका लढवण्याचे भाजपाने ठरवलेले दिसते आहे.

मराठा चेहरा
मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम असताना भाजपनं एकनाथ शिंदेंच्या रुपात मराठा मुख्यमंत्री दिला. आता मुंबई भाजप अध्यक्षपदीही शेलारांच्या रुपात मराठा चेहरा देत अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय.

सर्वपक्षातील नेत्यांशी उत्तम संबंध

आशिष शेलार विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. २०१२ ते २०१४ या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये ते मुंबईच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. सर्वपक्षातील नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध असल्याने नव्या जबाबदारीचा फायदा होऊ शकतो.

error: Content is protected !!