…तर बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे गटापुढे मोठा पेच…?

राज्यातील सर्व पोलीस स्टेशन हाय अलर्टवर

0 319

 

मुंबई : मिळालेल्या माहितीनुसार, संविधानाच्या शेड्युल १० नुसार बंडखोर आमदारांचा गट हा वेगळा गट स्थापन होऊ शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे गटासोबत पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या आमदारांना कोणत्या तरी पक्षात विलीनीकरण करावे लागेल. एकनाथ शिंदे गटापुढे भाजप किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचा पर्याय आहे. (Next to the Eknath Shinde faction is the BJP or Bachchu Kadu’s Prahar Party.)

 

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण फडकवून शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला (Mahavikad Aghadi Sarkar) जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेचे जवळपास ४० आमदार शिंदे समर्थक झाल्याने शिवसेना हवालदील झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे समर्थकांकडून राजकीय डावपेच आखले जात आहे. शिंदे गटात आणि शिवसेनेत (Shivsena) संघर्ष सुरु असून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलं आहे. अशातच राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गट नवनवीन रणनीती आखत आहे. परंतु, संविधानाच्या शेड्युल १० नुसार बंडखोर आमदारांचा गट हा वेगळा गट स्थापन होऊ शकत नाहीय. त्यामुळे एकनाथ शिंदे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

 

*बंडखोरीनंतर शिंदेंसमोर मोठा राजकीय पेच
*आमदारांची अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी विलीनीकरण हाच पर्याय ?
*भाजप किंवा प्रहारमध्ये गटाचं विलीनीकरण करण्याचाच पर्याय
*10 व्या अनुसूचीच्या परिच्छेद 4 नुसार वेगळा गट स्थापन होऊ शकत नाही
*आमचाच मुख्यमंत्री होणार असं बच्चू कडू म्हणाले होते

राज्यातील सर्व पोलीस स्टेशन हाय अलर्टवर
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक झाला आहे. राज्यातील अनेक भागात शिवसैनिकांनी शुक्रवारी आंदोलन केलं. मुंबईतील शिवसैनिक विशेष आक्रमक होते. शिवसैनिकांनी मंगेश कुडाळकर यांच्या कुर्ला येथील नेहरु नगर येथील कार्यालयावर हल्ला केला. यावेळी शिवसैनिकांच्या हातात लोखंडी रॉड होते. शिवसैनिक त्या रॉडने मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या नामफलकावर हल्ला करत होते. यावेळी त्यांनी कुडाळकर यांच्या नावाचं बॅनर फाडलं. तसेच त्यांचा बॅनवरील फोटो देखील फाडला.

 

शिवसैनिकांनी आमदार दिलीप लांडे यांचाही बॅनर फाडला. नाशिकमध्येही एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. मुंबई पोलिसांना विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील अशी सूचना पोलिसांना मिळाल्याचं वृत्त ANI नं दिलं आहे.

error: Content is protected !!