आगळंबे येथे डिजिटल सातबारा वाटप उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0 247

खडकवासला, प्रतिनिधी – आगळंबे येथील श्रीजित लॉन्स येथे 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या स्वर्गीय लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वतीने घरपोच डिजिटल सात बारा उपक्रमाचे उदघाटन हवेलीच्या तहसीलदार तृप्तीताई कोलते यांचे हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना त्यांनी नागरिकांनी शासकीय उपक्रमात सहभागी होऊन सेवेचा लाभ घ्यावा. इ पीक पाहणी ऍपचा वापर करून नोंदणी करावी असे आवाहन केले. या प्रसंगी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत विविध योजनांची माहिती देण्यात आली व प्रस्ताव दाखल करून घेतले. नागरिकांना नवीन आधार कार्ड व रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. मतदार नोंदणी व दुरुस्ती करण्यात आली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सांगरून येथील डॉ. जोशी आणि इतर कर्मचारी यांनी १३० शेतकऱ्यांचे लसीकरण केले.

shabdraj reporter add
माजी पंचायत समिती सदस्य नितीन वाघ यांनी त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन तहसीलदार मॅडम यांनी मागील दोन वर्षांपासून रखडलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून दिल्याबद्दल तहसीलदार मॅडम यांचे आभार मानले. तसेच या भागाचे अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे स्टेशन जवळ असल्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयिकडे लक्ष वेधून या कार्यालयातील अधिकारी खडकवासला भागात उपलब्ध होऊन नागरिकांची कामे करतील अशी व्यवस्था करावी अशी मागणी केली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अनिता ताई इंगळे आणि तहसीलदार कोलते मॅडम यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास हवेली पंचायत समिती सभापती बाळासाहेब मोकाशी, सरपंच विलास वांजळे, मानसी सोनवणे, दत्ताभाऊ पायगुडे, समीर पायगुडे, विकी मानकर, अभिजित तावरे, दिनेश पायगुडे, संतोष पायगुडे, दत्ता घुमे, अनंता पारगे, बाळासाहेब निढाळकर, अजित पायगुडे, नायब तहसीलदार संजय भोसले, अजय गेंगाने व महसूल विभाग आणि पंचायत समिती हवेलीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या भागाचे मंडलाधिकारी प्रमोद भांड यांनी सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!