‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंतांची अपरिचित गोष्ट’ नाट्यप्रयोगाला सेलूकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

1 47

सेलू,दि 22 (प्रतिनिधी)ः
प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणार्‍या ‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंतांची अपरिचित गोष्ट’ या नाट्यप्रयोगाला सेलूतील रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
साई नाट्य मंदिरात सोमवारी ( २१ नोव्हेंबर) सायंकाळी हा प्रयोग झाला. नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला, स्थानिक नाट्य कलावंत व कुरूंदकर प्रतिष्ठान, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने, हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त या प्रयोगाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते. नटराज पूजनाने नाट्यप्रयोगाला सुरुवात झाली. या वेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, माजी चिटणीस प्राचार्य द.रा.कुलकर्णी, चिटणीस प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, विश्वास कुरुंदकर, शामला पत्की, संयोजक प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, प्रा.ए.डी.कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रा.अजय अंबेकर यांनी केले आहे. कुरुंदकरांच्या जीवनातील विविध प्रसंग साभिनय अभिवाचनातून नाटकात साकारण्यात आले आहेत. त्यातील काही प्रसंगांनी प्रेक्षकांना अंतर्मुख केले. दोन अंकी नाट्यप्रयोग सुजाण समाज निर्माण करण्याचा संदेश देतो. एकेक प्रसंग नरहर कुरुंदकरांच्या जीवन आणि चिंतन, विचार शैलीतील विविध पैलू उलगडून दाखवतो. विचार स्वातंत्र्याचा आग्रह धरणारे कुरुंदकर यांचा बुद्धीवाद हा टोकाचा नव्हता. याचे प्रकर्षाने दर्शन घडते. नव्या पिढीला प्रेरित करणारे, जुन्या पिढीच्या चिंतन, आठवणींना उजाळा देणारे कुरुंदकरांवरील ही नाट्य कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. नाटकात अजय अंबेकर, ज्योती अंबेकर, दिलीप पाध्ये, राजीव किवळेकर, ज्योती पाध्ये, शुभंकर देशपांडे यांनी आपापल्या भूमिका ताकदीने साकारल्या आहेत. समन्वयक सोहम पिंगळीकर, प्रकाशयोजक मयुर सरकाळे, चित्र संयोजक शर्वरी पांडे, ध्वनी संयोजन दिव्या कुलकर्णी, संगीत प्रशांत ठाकरे, रेखाचित्रे शुभम हुलसुरे यांनी व्यवस्था सांभाळली आहे. प्रारंभी संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.अनिल कुलकर्णी, रोहिणी कुलकर्णी, मनिषा धर्माधिकारी यांनी केले, तर प्रा.सुभाष बिराजदार यांनी आभार मानले. नाट्यप्रयोगाला संस्थेचे सदस्य, नाट्य कलावंत, रसिक प्रेक्षक, श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती. प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी संयोजक डॉ.शरद कुलकर्णी, प्रा.ए.डी.कुलकर्णी गिरीश लोडाया, प्रभारी प्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे, मुख्याध्यापक नारायण सोळंके, संगीता खराबे, संतोष कुलकर्णी, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, अशोक लिंबेकर, बाबासाहेब हेलसकर, सुरेश हिवाळे, किशोर विश्वामित्रे, प्राचार्य एन.पी.पाटील, सुखानंद बेंडसुरे, भालचंद्र गांजापूरकर, शशिकांत देशपांडे, बन्सीलाल पद्मावत, बालाजी देऊळगावकर, कैलास मलवडे, प्रा.के.के.कदम, प्रा.देविदास ढेकळे, उल्हास पांडे, डॉ.प्रवीण जोग, ऊषा साळेगावकर, आदींसह संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!