व्हिजन इंग्लिश स्कूल येथे क्रीडा महोत्सवास सुरूवात
सेलू / प्रतिनिधी – दि. 25 नोव्हे ते 3 डिसे 2024 या कालावधीत आयोजीत वार्षिक क्रिडा स्पर्धा चे भव्य आयोजन येथील व्हिजन इंग्लिश स्कुल मध्ये करण्यात आले.
या वेळीं प्राचार्य हर्षद पांडव ,प्रमुख पाहुणे म्हणून प्रा .नागेश कान्हेकर तसेच व्यासपीठावर जाधव सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महान खेळाडू हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी क्रिडा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुलांना क्रिडा हे जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे सांगत खेळ भावना जपण्यास सांगितले. नागेश कान्हेकर सर यांनी विद्यार्थ्यांनी संघ भावना जोपासुन खेळांचा आनंद घ्यावा असे प्रतिपादन केले तसेच संघर्ष आणि एकीचे महत्व विशद केले .याप्रसंगी संस्था अध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी सर व युनिट हेड मनीष बोरगावकर सर यांनी हि मुलांना या प्रसंगी शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन प्रसंगी वर्ग दहावी अ विरुद्ध दहावी ब असा क्रिकेट चा सामना घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त असा सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदावंत सर व जयराम चव्हाण सर यांनी केले.