“श्री गुरुदेव दत्त; भ्रष्टाचारी करा जप्त”, दत्त भक्तंनी दिला नारा

रस्ता रुंदीकरणासाठी फक्त मंदिराचीच अडचन येते का ? दत्त भक्तांचा प्रशासनास सवाल

0 18

 

 

पुणे, प्रतिनिधी – मस्जिदीसाठी एक नियम आणि हिंदू मंदिरांसाठी दुसरा नियम ही द्वितर्फी भूमिका प्रशासनाची आम्ही चालून घेणार नाही. जर रस्ता रुंदीचे काम करायचं असेल तर या रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सरसकट पहिले हटवा त्यानंतर सूर्यमुखी दत्त मंदिराकडे नजर वर करून पहा असा इशारा देत “श्री गुरुदेव दत्त; भ्रष्टाचारी करा जप्त” असा नारा देखील समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी दिला. जर गुरूदत्त आपणास मान्य नसतील तर मनपा प्रशासनाने त्यांच्या कार्यालयातून दत्ताचे फोटो/ मूर्ती हटवावे असे आवाहन देखील केले.

 

 

मंदिर स्थलांतर रोखण्यासाठी, “श्री गुरुदेव दत्त भ्रष्टाचारी करा जप्त” असा नारा देत पुणे, शिवजीनगर, गणेशखिंड रोड, शिरोळे वस्ती येथील सुर्यमुखी दत्तमंदिराचे शिष्ट मंडळ सोबतच सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटना एकत्र येऊन पुणे महानगरपालिका उप. आयुक्त परिमंडळ २ कर्यायल येथे सहाय्यक आयुक्त उदास यांच्या सोबत संवाद साधून चर्चा केली आणि मंदिर आहे त्याचं ठिकाणी राहावे यासाठी निवेदन दिले.

 

 

या चर्चेसाठी समस्त हिंदू आघाडी संघटनेचे कार्याध्यक्ष मिलंद एकबोटे, भाजप शिवाजीनगर मतदासंघांचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, संदीप काळे, रमेश पाटील, दरवटकर, राजू पवार, नंदू बंडोरा, बाळासाहेबांची शिवसेनेचे धनंजय जाधव, मनसे चे रणजीत शिरोळे, आम आदिमी पार्टीचे सुभाष वारे, वैशाली डोंगरे, पतीत पावन संघटनेचे विक्रम मराठे, सुर्यमुखी दत्त मंदिरतर्फे बंडू बजारे, सागर भुजबळ, समीर डोक, अतुल सूर्यवंशी, निळकंठ यावकर, चंद्रकात चव्हाण, अक्षय पयगुडे, नरेंद्र गायकवाड, शुभम गायकवाड, आनंद भुजबळ, गणेश माने, चंदा पायगुदे, शिल्पा मारणे, सूनिता पडेर, अक्षता धूमाल, शेखर गायकवाड आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!