वाडी दमई परिसरातील कालव्याची दुरुस्ती सुरू करा. प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारी अभियंता यांच्या कडे मागणी

0 94

अनिल जोशी
झरी,दि 11 – परभणी तालुक्यातुन जाणाऱ्या निम्न दुधना कालव्याची व मायनरची कामे मागील ३ ते ४ वर्षापासून प्रलंबित असल्याने दुरुस्तीची कामे ताक्ताळ सुरु करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने माजलगाव कालवा विभाग क्र १० कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांच्याकडे मंगळवारी (दि.11) केली आहे.
झरी, मिर्झापूर, साडेगाव, सावंगी ( खु. ) व बोबडे टाकळी या भागातून हा कालवा जात असून ३ ते ४ वर्षापासून कामे प्रलंबित असल्याने मुख्य कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व झाडे वाढलेली आहेत. शिवाय मुख्य कालवा व मायनरची ( चारी ) कामे सुरु झालेली नाहीत. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असून देखील शेतकर्यांना मात्र कालव्याची व मायनरची कामे अर्धवट राहिल्याने व काही ठिकाणी सुरु न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे या भागातील शेतकारी सिंचनापासून वंचित राहत आहेत.
वाडी दमई येथील शेतकर्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे मायनर दुरुस्ती, मायरची रखडलेली कामे तात्काळ करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणे बाबत लेखी स्वरुपात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत दि.११ जानेवारी  रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाचे पदाधिकारी व वाडी दमई येथील शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळासह श्री. प्रसाद लांब कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा विभाग क्र १० यांची भेट घेऊन तक्रारीचे निवेदन दिले व संबंधित प्रलंबित कामे तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
या पूर्वी देखील मांगणगाव, मटकराळा व सावंगी खुर्द येथील शेतकर्यांनी रखडलेल्या कामांबाबत प्रहार जनशक्ती पक्ष परभणी च्या माध्यमातून लेखी स्वरुपात तक्रार केली होती त्या नुसार या भागात प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली त्यात मांगणगाव , मटकराळा व सावंगी खुर्द परिसरातील निम्न दुधना मुख्य कालवा व मायनर ची प्रलंबित व अर्धवट राहिलेली कामे पहिल्या टप्यामध्ये सुरु करण्यात आली असून ती आत्ता शेवटच्या टप्प्यात आहेत.
दुसऱ्या टप्याला तात्काळ सुरवात करुन वाडी दमई येथील कालव्यावरील प्रलंबित व रखडलेली कामे तात्काळ सुरु करावी व या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे असे ही या निवेदनात म्हंटले आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, उप तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पुंजारे, मीडिया प्रभारी नकुल होगे, वैभव संघई, वाडी दमई येथील शेतकरी महेश बोरमने, देवीदास बिडकर, प्रल्हाद विभुते, शिवराज बिडकर, दीपक बिडकर, नागेश विभुते, पंडित बिडकर, प्रभाकर गायकवाड, राहुल बिडकर, संदीप बिडकर, पांडुरंग तरवटे, महेश बिडकर, विनायक बिडकर इत्यादीच्या सह्या आहेत.

error: Content is protected !!