हिंगणघाट रेल्वे स्थानकावरील रेल्वे थांबा तात्काळ सुरू करा-मनसेनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

0 118

दशरथ ढोकपांडे
हिंगणघाट वर्धा ,दि 20 (प्रतिनिधी)ः
नवी दिल्ली येथील रेल भवन येथे केंद्रीय रेल्वे मंत्री  अश्विन वैष्णव तसेच केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन मनसेच्या पदाधिकांऱ्यांनी बुधवारी (दि.20)  हिंगणघाट शहरात रेल्वे स्थानकावरील रेल्वे थांबा पूर्वरत सुरू करण्याबाबत विस्तृत चर्चा केली.
कोरोना काळाच्या अगोदर हिंगणघाट रेल्वे स्थानकावर बहुतांश महत्त्वपूर्ण रेल्वे गाडयाच्या थांबा होता मात्र कोरोना काळानंतर हा थांबा रद्द करण्यात आला आणि त्यामुळे येथील जनतेला होणारा त्रास लक्षात घेता व जनतेची मागणी लक्षात घेता मनसेचे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले व मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी या दोघांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव व केंद्रीय मंत्री तथा विदर्भातील महत्त्वपूर्ण श्री नितीनजी गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी या महत्वपूर्ण प्रश्नी विस्तृत चर्चा केली.
हिंगणघाट शहर तालुक्याचे ठिकाण असून इथे मोठी बाजार पेठ आहे. अनेक टेक्सटाईल्स पार्क, सगुणा उद्योग समूह, मोहता उद्योग, कापड गिरणी, समूहासारखे महत्वाचे उद्योगधंदे आहेत हिंगणघाट व समुद्रपूर शहराची लोकसंख्या मोठया प्रमाणात असून ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच नौकऱ्यासाठी अमरावती, पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई ला ये-जा करतात तसेच विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट शहरातच आहे.
अश्विनजी वैष्णव यांच्या व्यस्तत्तेमुळे त्यांना देण्यात येणारे निवेदन हे त्यांचे मुख्य कार्यपालन अधिकारी  वेदप्रकाश यांनी स्वीकारले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय रेल्वे मंत्रालयातर्फे लवकरात या प्रश्नांची गंभीर्याने नोंद घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मनसेचे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या शिष्टमंडळाना देण्यात आले!

error: Content is protected !!