शेतीपंपाचे रोहित्र बंद न करता वीजबिलासाठी सवलत द्यावी-बच्चूभाऊ कडू यांना निवेदन

0 542

निफाड,दि 23 (प्रतिनिधी)ः
निफाड तालुक्यात सर्वत्र वीज वितरण कंपनीने ट्रांसफार्मर बंद करून जून मी अन्याय सुरू केला आहे परंतु सद्यस्थितीत द्राक्षे हे परकीय चलन मिळवून देणारे मुख्य पीक असल्याने ते निघेपर्यंत वीज बिलात सवलत द्यावी अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने
गोर-गरीब व दिव्यांगाचे कैवारी,शेतकरी नेते नामदार ओमप्रकाश (बच्चुभाऊ)कडु राज्यमंत्री,शालेय व महिला बालकल्याण यांना दिले आहे.
सद्यस्थितीत महावितरण कंपनीने जुलमी पद्धतीने शेतीपंपाचे ट्रान्सफार्मर बंद करण्याचा धडाका लावला असुन आमची मुख्य कांदा, द्राक्ष, टोमॅटो, सोयाबीन आदी मुख्य पिके निघेपर्यत वीज वितरण कंपनीने विज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. उत्पादित मालाला खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसतानाही व कोणाच्याही परिस्थिती दोन वर्षापासून शेतकरी वर्गाला त्रस्त करत असल्याने त्यातच शेतकऱ्यांची मुले शैक्षणिक संस्थाचालक शैक्षणिक शुल्कापोटी लहान-लहान मुलांना वर्गाबाहेर उभे करत आहे.तसेच शैक्षणिक संस्थांच्या बसमध्ये येऊ नका अशी भयानक वागणुक देत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून आमदार बच्चुभाऊ कडू यांनी संबंधित महावितरण विभागाशी संपर्क साधून शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांवर होत असलेल्या जुलमी अत्याचाराच्या
विरुद्ध आदेशित करणेबाबत निवेदन व विनंती करतांना उपतालुकाप्रमुख विकास रायते,मा.सभापती शिवा सुराशे,मा.सभापती सोमनाथ पानगव्हाणे,गटप्रमुख राकेश रायते,कट्टर शिवसैनिक गोकुळ शिंदे,शाखाअध्यक्ष तुकाराम रायते व पदाधिकारी यावेळी प्रहारचे उपजिल्हाप्रमुख सागर निकाळे,प्रहारचे उपतालुकाप्रमुख आण्णासाहेब रायते व मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!