जुनी पेन्शन लागू करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

0 11

 

निफाड,दि 21 (प्रतिनिधी)ः
पंचायत समिती व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी राज्य पदाधिकारी बापू अहिरे यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली काढून निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष स्वप्निल कुंदे, चिटणीस मिलिंद पाने, तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कुशारे, एस. बी. खडांगळे, शंकर सांगळे, शिक्षक जुनी पेन्शन हक्क संघटनेचे प्रमोद क्षीरसागर तसेच इतर ग्रामसेवक संघटना, लिपिक वर्गीय संघटना आदींनी रॅलीत सहभागी होऊन तहसीलदारांना तोंडी व लेखी निवेदन देऊन गाराणे मांडले.

error: Content is protected !!