‘त्या’ आरोपींना फाशीच द्या

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सेलू कडकडीत बंद

0 525

 

 

सेलू, प्रतिनिधी – येथील एका गरीब कुटूंबातील अल्पवयीन मुलीला मोटारसायकल द्वारे पळवून नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी आज सर्वपक्षीय सेलू बंद चे आयोजन करण्यात आले होते .यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त पणे आपले व्यवहार बंद ठेऊन सहभाग घेतल्याने हा बंद १००% झाला.

येथील क्रांती चौकात शहरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी जी प सभापती अशोकराव काकडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, परभणी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मिलींद सावंत, माकपचे रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षाताई भांबळे, भाजपाचे जयसिंग शेळके आदींनी मनोगतात
आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करीत या कुटूंबाला आर्थिक मदत देखील सर्वांनी करावी असे आवाहन केले.

 

यावेळी राष्ट्रवादीच्या निर्मलताई लिपणे, मनीष कदम, वैभव वैद्य, रघुनाथ बागल, अशोकराव उफाडे, अभिजित राजूरकर, भाऊसाहेब सोनवणे, विठ्ठल कोकर, मुश्ताक रब्बानी, शेख दिलावर, गणेश निवळकर तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, शुभंकरोती फाऊंडेशनच्या महिला कार्यकर्त्या तसेच शहरातील नगरसेवक, डॉक्टर, वकील तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होत्या.

 

यावेळी मनोगतात सर्वांनी आरोपींना पोलिसांनी दोन दिवसात अटक केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

 

हा खटला जलदगती न्यायालयात चालवून लवकरात लवकर या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच पीडितांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांची शासकीय आर्थिक मदत देखील मिळाली पाहिजे .अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

शहरातील प्रमुख रस्त्यावरून हातात निषेधाचे फलक घेऊन एक मोर्चा देखील यावेळी काढण्यात आला व त्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तहसीलदार दिनेश झाम्पले यांनी मोर्चेकर्यांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी जीवाची पर्वा न करता पाठलाग करून आरोपींना पकडणाऱ्या युवकांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!