विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे पिंपळे निलख येथे आयोजन, प्रवीण तरडे, प्रा. नितीन बानगुडे यांची उपस्थिती

0 22

 

 

पिंपरी,दि १३ (प्रतिनिधी)ः  सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने मागील अठरा वर्षांपासून दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात येतो. या वर्षीचा गुणगौरव समारंभ १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पिंपळे निलख, मुख्य बस स्टॉप, मनपा शाळेसमोर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा असून प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान यावेळी होणार आहे. ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना एक स्मार्ट वॉच, एक स्कूल बॅग आणि सन्मान चिन्ह तसेच इतर पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. दिनकर दादोबा मालेकर, डॉ. जयसिंग कदम, डॉ. बाळकृष्ण रंगदळ, शांताराम हरिभाऊ साठे, भरत इंगवले, अनिल संचेती, कैलाससिंह चव्हाण, वनिता दीपक माकर, विजय पाटुकले, शंकर तांदळे, साई कवडे सनी शिंदे यांचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश आहे. तसेच पिंपळवण वृक्ष संवर्धन ग्रुप आणि इंडियन सायकलिंग क्लब या संस्थांचाही सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक सचिन साठे मित्र परिवार यांनी प्रसिद्ध दिले आहे.

error: Content is protected !!