श्री शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थी प्रेरण कार्यक्रम संपन्न

0 82

परभणी,दि 30 (प्रतिनिधी)ः
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात गुरुवार (दि.३०) रोजी पदवीच्या प्रथम वर्षासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी प्रेरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्या डॉ.विजया नांदापूरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, प्रबंधक विजय मोरे, कार्यक्रम समन्वयक डॉ.तुकाराम फिसफिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.श्रीनिवास केशट्टी म्हणाले, विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल तर येणारे काही वर्षे मेहनत करावी लागेल. महाविद्यालयात अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत त्यांचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्त्व परिपूर्ण बनवावे. विद्यार्थ्यांना अनेक करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असतात पण आपल्या क्षमता ओळखून आपले ध्येय साध्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. विजया नांदापूरकर, डॉ.रोहिदास नितोंडे, विजय मोरे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात छ.शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करत महाविद्यालय गीताने झाली. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा, सांस्कृतिक, प्रशासकीय विभागासह विविध विभाग आणि सोयीसुविधांचा परिचय संबंधित विभाग प्रमुखांनी करून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तुकाराम फिसफिसे, सुत्रसंचलन डॉ.प्रल्हाद भोपे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.राजू बडूरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.प्रशांत सराफ, डॉ.जयंत बोबडे, प्रा.डी. जी.गवळी, डॉ.दिगंबर रोडे, डॉ. सी.डी. बेले, प्रा.सविता कोकाटे, प्रा.अभिजित भंडारे, बाळकृष्ण पोखरकर, बाबाराव पल्लेवाड,साहेब येलेवाड, गणेश गरड, आदींनी पुढाकार घेतला.

 

error: Content is protected !!