‘ऋणानुबंध’ चे रविवारी प्रकाशन

0 85

 

सेलू, प्रतिनिधी – येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्राचार्य द.रा. कुलकर्णी यांच्या ‘ऋणानुबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (१७ एप्रिल) होत आहे.

अध्यक्षस्थानी चैतन्य महाराज देगलूरकर,तर पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख साहित्यिक डॉ.केशव सखाराम देशमुख उपस्थित राहणार आहेत. नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि सेलू तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात सकाळी साडे दहा कार्यक्रम आहे. उपस्थित राहावे,असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, सचिव तथा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, रजत प्रकाशन औरंगाबादचे अशोक कुमठेकर, संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, अजित मंडलिक यांनी केले आहे.

error: Content is protected !!