सुयोग इंग्लिश स्कूलचा 100 % निकाल

0 25

 

परभणी / प्रतिनिधी – येथील दर्गा रोडवरील सुयोग इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक मंडळ औरंगाबाद कडून मार्च/एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इ. दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत परभणी शहरातील सुयोग इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

 

यात कु. अदिती केशव कांदे ही विद्यार्थीनी 95.40 ℅ गुण घेऊन प्रथम, कु.सिध्दी अशोक पिंपळे ही विद्यार्थीनी 89.20 % गुण घेऊन द्वितीय तर श्रावण विठ्ठलराव घुले 84.20 % गुण घेऊन तृतीय आला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे, सौ. पुष्पा मुंढे, श्री संजय डहाळे, श्री मधुकर गव्हाणे, श्री राजेश देशपांडे, श्री विनोद डावरे, श्री पंकज अबोटी, प्राचार्य श्री सिद्धार्थ गवई, सुचिता थोरवटे, अमीन मुजावर, नारायण सुर्यवंशी, शेख अमजद सर, नरेंद्र नांदरकर ,श्रवंती पिंडी , अतिया देशमुख, रश्मी देशमुख, शुभम पाठक, मनोज कुलकर्णी आदीने अभिनंदन केले.

error: Content is protected !!