जिहादी कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करा; विहिंप,बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटना

0 73

नांदेड, गजानन जोशी – त्रिपुरा येथील धार्मिक तेढ निर्मितीच्या विषयाला जाणून बुजून तणावपूर्ण दिशा देण्यासाठी मुस्लिम समाजानी काढलेल्या मोर्च्याला पोलीस प्रशासनाची परवानगी तर नव्हतीच परन्तु तरीही जे मोर्चे काढले त्या मोर्चात तलवारी,गावठी कट्टे कुठून आले.

यादरम्यान पोलिसांवर दगडफेक केली गेली,व हिंदूंचे नुकसान केले गेले त्याविरोधात मोर्च्याच्या आयोजकांवर व ज्यांनी दगडफेक करून दुकानें फोडली,गाड्या जाळल्या,जनतेला मारहाण केली अशा समाज कंटाकावर कारवाई व्हावी.

नांदेड शहरात बंदच्या नावाखाली काही समाजविघातक प्रवृत्तींनी शहरातील व्यापारी,पोलीस व जनतेवर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला यामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली तसेच जनता,पत्रकार व पोलीस प्रशासनाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांवर हल्ला करून दुखापत करण्यात आली. कार्यक्षम प्रशासन व तत्पर पोलीस प्रशासन असून सुद्धा काही अशांतीप्रिय लोकांनी उन्माद कसा केला? कोविड प्रतिबंधात्मक नियम लागू असताना ‘नांदेड बंद’ च्या आयोजकांना कोणी पाठबळ दिले? नांदेड जिल्हा प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा असामाजिक तत्वांवर धाक राहिला आहे की नाही? असे प्रश्न सुद्धा संघटनेकडून देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहेत…

विश्व हिंदू परिषद – बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून यासंबंधी निषेध व्यक्त करण्यात आले,ह्या मोर्चाचे आयोजक तसेच इतर दोषींवर कठोर कारवाही करावी नाहीतर यानंतर अश्या लोकांवर प्रशासनाचा वचक राहणार नाही आणि यापेक्षा भयंकर परिणाम जिल्ह्यातील जनतेला व प्रशासनाला भोगावे लागतील यामुळेच हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना शोधून त्यांना कायद्याचा वचक दाखवावा अशी मागणी निवासी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी व पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे,मागणी मान्य न झाल्यास लवकरच समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!