जिल्हा परिषद सिईओ स्टेनो प्रकरणी कारवाई करा-अतिरिक्त जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

0 104

परभणी,दि 19 (प्रतिनिधी)ः
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्टेनो सदावर्ते प्रकरणाची नियमानुसार कार्यवाही करून कारवाई करण्याबाबत अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी महेश वडदकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे पत्र काढले आहे.

संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी सात जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्तांना निवेदन देत जिल्हा परिषद मधील सर्व सेवक व वाहनचालक यांना तात्काळ प्रमुख अधिकाऱ्यांचे पीए करून त्यांना पदोन्नती देणे अन्यथा शासनाची दिशाभूल करून सेवकाचे स्टेनो झालेले सदावर्ते यांची चौकशी करून नियमित करण्याबाबत अर्ज दिला आहे. तसेच त्यांनी 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणे असल्याबाबत नमूद केले आहे. या पत्रानंतर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी महेश वडदकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अत्यंत महत्त्वाचे कायदा व सुव्यवस्था प्रथम प्राधान्य या अंतर्गत पत्र देत निवेदनातील मुद्द्यांच्या अनुषंगाने नियमानुसार कार्यवाही करून निवेदन करण्यास प्रस्तावित आंदोलन करणे पासून आपल्या स्तरावरून परावृत्त करण्यात यावे असे पत्र वडदकर यांनी काढले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोणती कारवाई करतात  याकडे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!