श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

0 128

पूर्णा,दि 11 (प्रतिनिधी)ः
पूर्णा येथील श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालयात नेहरू युवा केंद्र परभणी तर्फे नुकत्याच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या .या स्पर्धेचे उद्घाटन श्री गुरू बुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तसेच स्वारातीम विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा गोविंदरावजी कदम व संस्थेचे सहसचिव मा.अमृतराज कदम यांच्या हस्ते संपन्न झालेल्या. या क्रीडा स्पर्धेसाठी कबड्डी, वॉलीबॉल,रस्सीखेच,100 मीटर धावणे व गोळा फेक या खेळाचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये तालुक्यातील अनेक खेळाडू चा व संघाच्या सहभाग झाले होते. कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गुरु जन्ना दास महाराज विद्यालय यांनी पटकावला व दुतिय क्रमांक श्री गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालया पूर्णा यांनी पटकावला. तसेच महिला गटात कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक एकता कबड्डीचा संग पूर्णा यांनी मिळवला आणि द्वितीय क्रमांक एकलव्य कबड्डी संघ, पूर्णा यांनी मिळवला. व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालय, पूर्णा व द्वितीय क्रमांक गुरु जगन्नाथ दास महाराज विद्यालय चुडावा यांनी मिळवला. रस्सीखेच या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुंभार वाडी संग दुतिय क्रमांक जय भवानी मित्र मंडळ यांनी मिळवला. 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक भगवान शिवाजी सरोदे तर द्वितीय क्रमांक आर्यमान सकलादी भोळे यांनी मिळवला गोळा फेक या स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्जुन शिवाजी भोसले व दुतिय क्रमांक ज्ञानेश्वर निवृत्ती सोळंके यांनी मिळविला या स्पर्धा श्री गुरू बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथे संपन्न झाल्या या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा सतीश बरकुंटे,सज्जन जयस्वाल,अब्दुल अन्सार, शंभू गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक प्राध्यापक यूपी मिटकरी सर,गिरीश डावरे सर, चाकोते सर हे उपस्थित होते

error: Content is protected !!