तालुकास्तरीय दृष्टीदोष मूल्यमापन शिबिर संपन्न

145 137

पूर्णा, सुशिलकुमार दळवी –  ग्रामीण रुग्णालय पूर्णा येथे 0 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे गट साधन केंद्र पूर्णा व तालुका आरोग्य विभाग पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने 68 विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी करून दृष्टीदोष मूल्यमापन चाचणी करण्यात आली व त्यांना पुढील सुविधा व साहित्याची शिफारस करण्यात आली. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्री.अरविंद वाघमारे, नेत्ररोग तज्ञ डॉ जाधव ,नागेश देशमुख तालुका वैद्यकीय अधीक्षक विष्णू कानडखेडकर तसेच चव्हाण मॅडम यांनी तपासणी केली. सदर शिबिरास पूर्णा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री मारुती सूर्यवंशी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली व सदरील शिबिरास शुभेच्छा दिल्या सदर शिबिरास पूर्णा तालुक्यातील केंद्रप्रमुख सुंदर धवन शामसुंदर मूकमोड व बाबासाहेब का शिंदे यांनी भेट दिली सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते शिबिरा दरम्यान विद्यार्थ्यांना अल्पउपहार व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर शिबिरासाठी तालुक्यातील केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पालक व शिक्षक यांच्या यांची सहकार्य लाभले

error: Content is protected !!