निफाड मधील अखेरच्या टप्यातील २३ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू

0 164

 

रामभाऊ आवारे
निफाड,दि 14 ः
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका रद्द झाल्यानंतर स्थानिक विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमाला गती आली आहे आता निफाड तालुक्यातील चौथ्या आणि शेवटच्या टप्यातील २३ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली असून या संस्थांसाठी १८ ,२० व २२ जून रोजी मतदान व याच दिवशी मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासानंतर मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने रणजित पाटील, तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, निफाड व निवडणूक शाखेचे प्रमुख दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.

चौथ्या व शेवटच्या टप्यातील २३ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे त्यात कारसुळ, पिंपळगाव बसवंत ,खेरवाडी,शिंगवे,टाकळी विंचूर ,ब्राम्हणवाडे,दिंडोरी (तास ),सावरगाव निफाड ,पचकेश्वर या १० विविध कार्यकारी सहकारी संस्थांसाठी ११ मे २०२२ ते १८ मे २०२२ पर्यंत नामनिर्देशन पत्र विक्री व स्विकृती तर १९ मे ०२२ रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाणार आहेत .तसेच २० मे २०२२ ते ३ जून २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे तर १८ जून २०२२ रोजी वरील १० संस्थांसाठी मतदान व अर्धा तासानंतर लगेचच मतमोजनी प्रक्रिया राबविली जाणार आहेत. याच प्रमाने कुरडगाव ,वेळापुर ,कोटमगाव,नांदगाव ,नांदूर्डी, दात्याने, देवपुर,गोदावरी-चांदोरी,गोरठाण ,रेडगाव,कसबे-सुकेने ,मांजरगाव ,पालखेड या १३ संस्थासाठी १३ मे २०२२ ते २० मे २०२२ पर्यंत नामनिर्देशन पत्र विक्री व स्विकृती तर २३ मे ०२२ रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाणार आहेत .तसेच २ ४ मे २०२२ ते ७ जून २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे तर २० जुन २०२२ रोजी वरील १३ संस्था पैकी ९ संस्थांसाठी मतदान व अर्धा तासानंतर लगेचच मतमोजनी प्रक्रिया राबविली जाणार आहेत तसेच रेडगाव ,कसबे सुकेने, मांजरगाव ,पालखेड, या ४ संस्थासाठी २२ जुन रोजी मतदान व त्याच दिवशी मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासात मतमोजणी करून निकाल घोषित केला जाणार आहे ग्रामीण भागातील सहकारी संस्था व तेथील राजकारण दिवसेंदिवस तापू लागले आहे मर्यादित सभासद व त्यांच्याकडून होणारे मतदान हा त्या उमेदवारांच्या राजकारणाचा कौशल्याचा भाग समजला जातो गेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेती उत्पादन घटले असून खर्च मोठ्या प्रमाणावर झाला आहे परिणामी अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेला दिसतो आहे त्यामुळे अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होताना दिसत आहे अनेक मोठमोठ्या शेतकऱ्यांकडे कर्ज असल्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार नाही परिणामी ते शेतकरी या सहकारी संस्थांसाठी उमेदवारी सुद्धा करू शकत नाही अशी अनेक गावात परिस्थिती आहेत.

error: Content is protected !!