एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आणि अनिल परबांची बैठक संपली, थोड्याच वेळात होणार मोठी घोषणा

0 44

एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ  आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील बैठक संपली आहे. बैठक संपवून परिवहन मंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सह्याद्री अतिथिगृहातून बाहेर पडले. आज संध्याकाळी 6 वाजता एकत्र पत्रकार परिषद घेऊन ST संपाच्या संदर्भात मोठी निर्णायक घोषणा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत मंत्रालयात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजीत पवार यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात गेले आहेत. बैठकीतील निर्णय अजित पवारांना कळवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करून आजच संप मिटवण्यासाठी मोठी घडामोड सुरू झाली आहे.एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आणि अनिल परब, उदय सामंत यांच्यात चर्चेच्या एकूण दोन फेऱ्या झाल्या. या दोन्ही चर्चेच्या फेऱ्या सकारात्मक झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संध्याकाळी एसटी कर्मचारी मागे घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

error: Content is protected !!