पुर्णेत ठाकरे गटाचा मेळावा उत्साहात संपन्न

0 109

केदार पाथरकर
पूर्णा,दि 06 ः
दि 06डिसेंबर रोजी पूर्णेतील जुना मोंढा परिसरातील राजारामबापू सभागृहात झालेल्या शिवसेना मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
संपर्कप्रमुख रवींद्र वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला, यावेळी व्यासपीठावर डॉ विवेक नावंदर, राजू कापसे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, शहरप्रमुख संकेत कदम, मा शहरप्रमुख बंटिभाऊ कदम, शाम कदम, अड राज भालेराव, संतोष एकलारे, गंगाप्रसाद आणेराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते, मेळाव्याला शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती, यावेळी आपल्या भाषणात गद्दार सरकार काही दिवसात खालसा होणार असून निष्ठावंत शिवसैनिकानी जोमाने कामाला लागावे आणि लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद सह सर्व निवडणुकीत भगवा फडकवा असे आवाहन शिवसैनिकांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अड राज भालेराव यांनी केले तर आभार शहरप्रमुख संकेत कदम यांनी मानले

error: Content is protected !!