विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंचचे कार्य कौतुकास्पद- भास्कर नाना आवारे यांचे प्रतिपादन

0 62

 

निफाड,दि 20 (प्रतिनिधी)ः
अध्यात्मिक विठ्ठल रखुमाई विचार मंच परिवाराने साधू संतांच्या विचारांना उजाळा मिळावा व संत विचारांचा समाज मनावर प्रभाव पडावा हीच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अध्यात्मिक विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे जे कार्य हाती घेतले आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन दत्त शिरोळ साखर कारखाना (इचलकरंजी) मा.व्यवस्थापक भास्कर नाना आवारे यांनी केले.

शिरवाडे ता निफाड येथील सुप्रसिद्ध भागवताचार्य हभप विठोबा दादा आवारे यांची विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंचच्या राज्य कार्यकारिणी मार्गदर्शक पदी निवड झाली. त्यानिमित्ताने शिरवाडे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजी दत्त शिरोळ कारखान्याचे माजी व्यवस्थापक भास्कर नाना आवारे (शिरवाडे) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंचचे संयोजक तथा वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष रामभाऊ आवारे, वनसगाव विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.रोटे, सत्कार मुर्ती भागवताचार्य हभप विठोबा दादा आवारे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे गोपालन समिती जिल्हाप्रमुख तथा मतोबा देवस्थानचे नवनाथ माऊली बोरगुडे ( नैताळे) , हभप किरण महाराज सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य मजुर फेडरेशन संचालक गोरखनाथ शिंदे, शिरवाडे विकास सोसायटी माडी चेअरमन शशिकांत आवारे ,माजी सरपंच बाळासाहेब आवारे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित प्राचार्य सी डी रोटे यांनी शिरवाडे करांनी विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंचच्या कार्यास जो पाठिंबा दिला त्यामुळे हे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत नक्कीच पोहोचतील असे प्रतिपादन केले.यावेळी विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंचचे संयोजक रामभाऊ आवारे यांनी अध्यात्मिक कार्य करत असतांना विशेषतः वारकरी संप्रदायाचे विचार पत्रकारितेच्या माध्यमातून तसेच सामाजिक कार्यातुन प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे हा वसा आम्ही घेतला आहे. अल्पावधीतच विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंचाचा राज्यभरात विस्तार झाला आहे. या कार्यात आपणही पुण्याची वाटेकरी व्हावे या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त भाविकांनी या विचार मंचात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी सत्कारमूर्ती भागवताचार्य हभप विठोबा दादा आवारे यांचा मान्यवरांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांचा गावातील प्रतिष्ठित नागरिक माणिक नाना आवारे, कारभारी चिताळकर, त्रंबक आवारे, निशिकांत चिताळकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी ॲड बाबासाहेब चिताळकर, बाबुराव आवारे, गोरख भाऊ शिंदे, केदू नाना शेळके, प्रल्हाद कदम, बाळासाहेब आवारे, सुभाष चिताळकर, प्रकाश आवारे, सुभाष काळे, शिवाजी काळे, रमेश जिरे, संपत आवारे, सूर्यभान कटाळे, जगन आवारे, सुनील धनराव, दत्तात्रय आवारे, रमेश शेळके, कलंदर शेख, खंडू धनराव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!