‘हे’ टॉप कोर्सेस बदलू शकतात तुमची आर्थिक परिस्थिती; मिळेल भरघोस पगाराचा जॉब

0 487

शब्दराज ऑनलाईन,दि 19 ः
सध्या संपूर्ण देशात प्रवेशांचा सिझन सुरू आहे. दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थी निरनिराळ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यातही खटपट करत आहेत. बारावीनंतर नक्की कोणता कोर्स करायचा म्हणजे चांगल्या पगाराचा जॉब मिळू शकेल असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यात भारतातील सध्याची जॉब्सची स्थिती बघता ज्या अभ्यासक्रमामध्ये जॉब मिळण्याची गॅरेंटी आहे असाच कोर्स विद्यार्थ्यांना करायचा आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही कोर्सेस  सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगल्या पगाराचा जॉब मिळू शकेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती नक्कीच बदलेल. चला तर मग जाणून घेऊया.

 

सायबर सुरक्षा (Cyber Security)
ध्याच्या कळलंत ऑनलाईन फ्रॉड होण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसतो आहे. म्हणूनच आगामी काळात डेटाची सुरक्षा ही सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे. भारतात आता अशा लोकांची मागणी जगभरात वाढत आहे जे सायबर सुरक्षेमध्ये विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी कंपन्यांना मदत करू शकतात. आकडेवारीनुसार, भारतात सायबर सुरक्षा प्रोफेशनल्सची मागणी 2024 पर्यंत 200 टक्क्यांनी वाढणार आहे. यामुळेच सायबर सुरक्षेमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. बारावीनंतर जर तुम्ही या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊन सायबर सुरक्षा क्षेत्रात प्रवेश करू शकता आणि चांगल्या पगाराच्या पॅकेजची नोकरी मिळवू शकता. त्यास्थाशी तुम्हाला यामध्ये शिक्षण घेणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला बारावीनंतर B.Tech (IT), B.Tech (IT Engineering),  B.Tech (सायबर सुरक्षा आणि फॉरेन्सिक), B.E. (IT), बीएससी (फॉरेन्सिक सायन्स), डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी यापैकी कोणताही कोर्स करणं आवश्यक असणार आहे.


आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence)
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही आता काळजी गरज बनली आहे. याशिवाय कोणत्याही कंपनीमध्ये काम चालू शकत नाही. म्हणूनच आता या कोर्सला असाधारण महत्त्वं प्राप्त झालं आहे. विविध औद्योगिक क्षेत्रात याची मागणी वाढली आहे. केवळ ऑटोमोबाईलमध्येच नव्हे तर आरोग्य सेवा, कृषी, शिक्षण आणि वाहतूक क्षेत्रातही याची मागणी वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रात भरघोस पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता वाढली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना B.Tech. कंप्‍यूटर सायन्स, B.Tech. रोबोटिक्‍स अँड ऑटोमेशन, B.Tech. इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजीनिअरिंग, B.Tech. EC इंजीनिअरिंग, B.Tech. इलेक्‍ट्र‍िकल इंजीनिअरिंग हे कोर्सेस करणं आवश्यक आहे.

फार्मास्‍यूटिकल सायन्स (Pharmaceuticals Science)
फार्मास्युटिकल क्षेत्र सध्या तेजीत आहे आणि येत्या काळात ते आणखी वाढेल. या क्षेत्रात भारत संपूर्ण जगात आपला ठसा उमटवत आहे. कोरोना महामारीनंतर या क्षेत्रात रोजगार वाढला आहे. येत्या काळात हे क्षेत्र अधिकाधिक लोकांना कामावर ठेवेलच, पण एक चांगले पॅकेजही मिळेल. त्यासाठी तुम्हाला बॅचलर इन फार्मसी, बॅचलर इन फार्मसी (लेटरल एंट्री), बॅचलर इन फार्मसी (आर्युवेद), डिप्‍लोमा इन फार्मसी यापैकी कोर्सेस करावे लागतील.

नर्सिंग (Nursing)
भारतात वैद्यकीय सुविधा वाढत असल्यानं भारतातील नर्सिंग अभ्यासक्रमांची मागणीही त्याच वेगाने वाढत आहे. परिचारिका कोणत्याही आरोग्य सेवा व्यवस्थेतील स्तंभासारखी असतात आणि भारतीय परिचारिकांना जगभर मागणी असते. म्हणूनच हा कोर्स महत्त्वाचा आहे. यामध्ये जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला B.Sc. नर्सिंग, ANM, GNM हे कोर्सेस करावे लागतील.

 

error: Content is protected !!