बोकडदरे शाळेच्या विद्यार्थिनींनी एकपात्री प्रयोगातून सादर केले राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुलेंचे विचार

0 102

निफाड,दि 13 (प्रतिनिधी) ः
राजमाता जिजाऊ आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्य शिक्षण विभागाच्या ” वतीने आयोजित राजमाता जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा” या अभियानांतर्गत तालुक्यातील बोकडदरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात आले .
या कार्यक्रमाअंतर्गत वेशभूषा स्पर्धा, मुला मुलींची आरोग्य तपासणी, निबंध लेखन स्पर्धा, यशस्वी महिलांच्या मुलाखती, चित्रकला स्पर्धाचा समावेश होता. समारोपच्या दिवशी व्हर्च्युअल मंच्यावर इयत्ता आठवीतील स्नेहल सानप व सलोनी पवार यांनी अनुक्रमे “मी आजची सावित्री ” व “मी जिजाऊ बोलते ” या विषयांवर एकपात्री प्रयोग सादर केले.
या कार्यक्रमात निफाडचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी केंद्रप्रमुख सुभाष उगले विस्तार अधिकारी वसंत गायकवाड , बोकडदरे जि. प प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक मंदा भागवत यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी शिक्षक संगीता शिंदे, विजया भडके, उज्ज्वला भारती, मनोज सोमवंशी, संदीप महाजन उपस्थित होते. याप्रसंगी संगीता शिंदे, विजया भडके, उज्ज्वला भारती, मनोज सोमवंशी, संदीप महाजन उपस्थित होते

error: Content is protected !!