हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, कयाधुला महापूर,नुकसानभरपाई त्वरित मिळून द्या-आ .डॉ प्रज्ञाताई सातव

0 99

आनंद बलखंडे
आ बाळापूर,दि 14 ःगेल्या चार दिवसांपासून चालू आसलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून संततधार पाऊस पडत आहे, या मुळे नदी नाल्यांना पूर आला असून अतिवृष्टी मुळे हजारो हेक्टर वरील पिकांची नासाडी झाली आहे ,जून महिन्यात लांबलेल्या पावसा मुळे दुबार पेरणी चे संकट दिसत होते परंतु जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली व अतिवृष्टी चा पाऊस पडत आहे. कळमनुरी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने निघालेले पिके धोक्यात आली आहेत .राष्ट्रीय महामार्ग चे काम अर्धवट राहिल्याने शेतात पावसाचे पाणी तुंबलेल्या ने पिकाचे नुकसान झाले आहे .या बाबतीत आ. संतोष बांगर यांनी सदरील गुतेदारास इशारा देऊन नुकसानीची मागणी केली आहे .झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत त्वरीत खात्यात जमा करावी अशी मागणी आ.प्रज्ञाताई सातव यांनी सुद्धा कळमनुरी तहसीलदार नांदे याना दिलेल्या निवेदनात केली आहे .
बाळापूर शहराला ही या जोरदार पावसाचा फटका बसला असून बाळापूर वाडी या भागात पुलावरून पाणी वाहत असून अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे . नाल्या ला पूर आल्या मुळेसंपर्क तुटला आहे , पुलाची उंची वाढविण्या ची मागणी या भागातील नागरिक गेल्या वीस वर्षां पासून करत आहेत . शहरातील देवीगली , बसस्थानक , देव पेलेस लॉज , या परिसरात पाणी साचले आहे , हनुमान नगर या भागात , पाणी घरा मध्ये शिरल्या ने हजारो रुपयाच्या संसार उपयोगी साहित्याची, अन्नधान्याची ची नासधूस झाली आहे. महसूल विभागाने या नुकसानी चे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिक , शेतकरी करत आहेत .

error: Content is protected !!