श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा महारॅली, तीन हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

0 135

 

परभणी,दि 12 (प्रतिनिधी)ः आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार (दि.१२) रोजी हर घर तिरंगा अभियान महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील रॅलीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी झेंडा दाखवून प्रारंभ झाला. यावेळी उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, प्रा. अप्पाराव डहाळे,प्रा. नारायण राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरील महारॅलीमध्ये राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, उन्नत भारत अभियान, क्रीडा विभागाच्या विद्यार्थ्यासह कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. हर घर तिरंगा, राष्ट्रध्वजाचा सन्मान करा, बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा, भारताचे स्वातंत्र्य चिरायु राहो इत्यादी घोषणांनी परिसर दणाणून निघाला. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारवरून निघालेली ही महारॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून महाविद्यालयातील मैदानात सामूहिक राष्ट्रगीताने समारोप झाला. सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या ड्रेस कोडसह लांबच लांब लागलेल्या रांगेत आणि शिस्तीत चालत असलेले पाहून परभणीकरांना वेगळी अनुभूती मिळाली.
या महारॅलीच्या यशस्वीतेसाठी स्थानिक वाहतूक पोलीस शाखा, राष्ट्रीय छात्रसेनेचे लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ,महोत्सव समन्वयक डॉ.जयंत बोबडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ.तुकाराम फिसफिसे,डॉ.दिगंबर रोडे, प्रा.राजेसाहेब रेंगे, प्रा.सविता कोकाटे, प्रा.विलास कुराडकर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.संतोष कोकीळ, उन्नत भारत योजना प्रमुख डॉ.प्रल्हाद भोपे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!