सोशल मिडियाच्या माध्यमातून मिळालेल्या देणगीतून तारुखेडले येथील म्हसोबा महाराज स्थानाचा कायापालट

0 104

 

रामभाऊ आवारे
निफाड,दि 13 ः
श्रीक्षेत्र तारुखेडले येथील म्हसोबा महाराज स्थानाचा सोशल मिडिया च्या माध्यमातून देणगी जमा करून सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले या साठी तारुखेडले येथील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत गवळी यांनी व्हाट्सअप, इ. सोशल मिडिया च्या माध्यमातून मित्र व इच्छुक देणगीदारांना आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत देणगीदारांनी गुगल व फोन पे द्वारे देणगी दिली या माध्यमातून रु. १,०२,३१३/- एवढी भरघोस रक्कम देणगी स्वरूपात जमा झाली यातून मंदिर कामा साठी पूर्ण रक्कम रु. १,०२,३१३/- खर्च करण्यात आली या कामासाठी तारुखेडले येथील जेष्ठ नागरिक श्री पुंडलीक विठोबा चव्हाण व गणेश अशोक गवळी यांचे खुप सहकार्य लाभले जमा होणाऱ्या देणगीतून म्हसोबा महाराज स्थानाजवळ भव्य ओटा व शेड बांधकाम करण्यात आले नंतर म्हसोबा मूर्ती ची स्थापना करण्यात आली यात काही वस्तुरूपी देणगीदारांनी दान केले तारुखेडले स्थित श्री कचरू वाघ यांच्या तर्फे म्हसोबा व साथी आसरा माता मूर्ती देण्यात आली व श्री नंदू खंडू जगताप यांनी वाळू, श्री. नितीन शिवाजी जगताप यांनी पाया खोदकाम, श्री. वैभव राजेंद्र जगताप यांनी घंटा असे मंदिर कामासाठी दान केले श्री युवराज जगताप,वाल्मिक गवळी, माई जगताप यांनी प्रत्येकी ५० किलो धान्य अन्नदान साठी दान केले.तारुखेडले येथील म्हसोबा महाराज स्थान अनेक वर्ष पासून दुर्लक्षित होते पाऊस,उन वारा आदी कारणांमुळे स्थानाची अवस्था बिकट झाली होती त्या स्थानाच्या जागी भव्य असे म्हसोबा स्थान उभे राहावे याची आवश्यकता होती म्हणून श्री. प्रशांत गवळी यांनी सोशल मिडिया च्या माध्यमातून देणगी जमा करण्याचे काम केले जमा होणाऱ्या देणगीतून मूर्ती स्थापना, पूर्ण ओटा व शेड बांधकाम, रंगकाम, लाईट, फरशी व इतर छोटी मोठी विविध दुरुस्तीचे कामे करण्यात आली. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा महापूजा आयोजित करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद चा कार्यक्रम घेण्यात आला अशाच सामाजिक कामांकरिता सोशल मिडिया चा वापर करणे हे प्रशांत गवळी यांनी सदर काम प्रगतीपथावर नेऊन जनसामान्यांना पटवून दिले की सोशल मिडिया चा वापर फक्त मनोरंजनासाठी नसून सामाजिक हिता साठीही करता येते हे त्यांनी दाखवून दिले. सोशल मिडिया वरील प्रतिसाद लक्षात घेता श्रीक्षेत्र तारुखेडले येथील गावातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात म्हसोबा स्थान सुशोभीकरणासाठी श्रमदान केले या पुढेही सोशल मिडिया च्या माध्यमातून सामाजिक कामे पार पाडण्यात येतील तसेच इतर गावातील तरुणांनी समाज हितासाठी सोशल मिडियाचा वापर करावा या कामासाठी तारुखेडले गावाचे तरुण मंडळ किशोर व किरण चव्हाण, प्रमोद व पंकज गवळी, सुभाष व मंगेश क्षीरसागर, नयन व प्रशांत व अविनाश शिंदे,अण्णा शिंदे, कृष्णा देशमुख, सागर जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर कामाचे सोशल मिडियातुन व गावकऱ्यांनी प्रशांत गवळी यांचे खुप कौतुक केले आहे..

error: Content is protected !!