लोअर दुधनाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0 206

सेलू ,दि 13 ः
येथील लोअर दुधना धरणात होत असलेल्या पाण्याची आवक लक्षात घेता जलाशय प्रकल्प आराखड्यानुसार आज दि १३ जुलै रोजी दुपारी पाच वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.३५ मीटरने उघडण्यात आले आहेत .व यामधून एकूण २३५७ क्यूसेस इतका विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे .त्यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढून पूरपरिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही .तरी नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षा कडून देण्यात आला आहे .धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेता विसर्ग कमी अधिक होऊ शकतो असेही कळविण्यात आले आहे .
या काळात नदीपात्रात कुणीही जाऊ नये ,पाळीव प्राणी,गुरेढोरे ,विद्युत मोटारी तसेच इतर साहित्य देखील त्वरित काढून घ्यावे .असेही आवाहन महसूल विभागामार्फत करण्यात आले आहे .

error: Content is protected !!