धारुर तालुक्यातील भिषण अपघात भोकरचे २ जण ठार तर एक जखमी

0 116

 

भोकर, गंगाधर पडवळे – येथील तरुण काही कामानिमित्त जात असताना दि.16 जानेवारी रोजी धारुर तालुक्यातील तेलगाव जवळ बीड परळी महामार्गावर परळीकडुन भरधाव वेगात स्वीप्ट डिझायर गाडीची बाभळीच्या झाडाला जोरात धडक बसुन भिषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी तेलगाव येथे घडली.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरूण रविवारी एम. एच.13 सीके 0441 या स्वीप्ट डिझायर गाडीने भोकर येथुन तेलगाव मार्गे बीडला जात असताना तेलगाव नजीक भिषण अपघात झाला. येथील परळी रोडवर असलेल्या अमर बिअरबार जवळ सदर गाडीच्या चालकाचे स्टेरिंगवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रोडखाली खड्यात असलेल्या बाभळीच्या झाडाला जाऊन जोरात धडकली.
गाडी एवढ्या जोरात धडकली की कार चा अगदी चक्कानाचूर झाला या अपघातात चालक व चालकाच्या बाजूच्या सिटवर बसलेला तरूण जागीच ठार झाले. तर मागच्या सिटवर बसलेला तरूण समोरच्या व मागच्या सिटमध्ये अडकला त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली असून मयत व जखमी नांदेड जिल्ह्यातील भोकर शहरातील प्रफुल नगर येथील आहेत तर एक तरूण गंभीर जखमी झाल्याचे समजते. गावालगतच अपघात झाल्याने अमर बिअरबारचे मालक कांता पाटील लगड हे इतर नागरिकांना घेऊन तात्काळ घटनास्थळी गेले.

अपघात झाल्याचे समजताच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु ते बाहेर काढता येत नव्हते. त्यामुळे गॅस वेल्डिंग ने वेल्डिंग करून, एका मयतास बाहेर काढले. तर जखमी व अन्य एका मयतास जेसीबीच्या सहायाने पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले.
यानंतर मयत व जखमींना 108 रूग्ण वाहिकेने रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड तसेच जेसीबी (JCB) मालक मच्छिंद्र माने तसेच शेकडो नागरिकांनी माणुसकी दाखवत गाडीतील मयत व जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढत एका जखमी तरूणाचा जीव वाचला.

error: Content is protected !!