अवैध वाळू वाहतुकीची दोन वाहने पकडली

0 18

परभणी,दि 25 (प्रतिनिधी) ः
पोलीस अधीक्षक जयंत मिना यांच्या विशेष पथकाने नानलपेठ पोलिस ठाणे हद्दीत तर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने झरी येथे कारवाई करत अवैध वाळू वाहतूकीची अशी दोन वाहने ताब्यात घेतले आहेत.
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले, कर्मचारी सय्यद उमर, अजहर पटेल, सय्यद जाकेर यांच्या पथकाने नानलपेठ पोलिस ठाणे हद्दीत धाररोड वर कारवाई करत एम एच 27 बी.एक्स- 2289 या क्रमांकाचा टिप्पर ताब्यात घेतला. त्यामध्ये 26 हजार रुपये किमतीची वाळु अढळुन आली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर  ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी देविदास बुकरे, योगेश सानप यांच्या पथकाने झरी येथे वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला.या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जनावर गुन्हा दाखल झाला आहे.

error: Content is protected !!