प्रा. उदय पाटकर यांना पी.एच.डी. पदवी

0 637

पुणे – भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय लवळे येथे संगणक विभाग प्रमुख म्हणून काम करणारे प्रा. उदय चंद्रकांत पाटकर यांना राजस्थान येथील श्री जगदीश प्रसाद छाबरमल टिबरेवाल विद्यापीठाची संगणक विभागातील विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) ही पदवी जाहीर झाली.खानदेश ची सुप्रसिद्ध भाषा अहिराणी. इंग्रजी भाषेतील काही वाक्ये अहिराणी बोलीभाषेत रुपांतर करण्याचा हा प्रबंध त्यांनी सादर केला. व अहिराणी भाषेत भाषांतराचा प्रबंध सादर करणारे ते भारतातील पहिले डॉक्टर ठरले. त्यांना प्रा. डॉ.सुहास पाटील व , प्रा. डॉ. प्रसादु पेड्डी यांचे प्रबंध सादर करण्यात मोलाचे मार्गदर्शन लाभले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.पाटील यांनी वेळोवेळी योग्य सल्ला देवुन उपकृत केले. त्यांच्या ह्या यशात आजी – आजोबा, वडील तसेच आई, आत्या,काका,पत्नी सौ. आश्विनी,मुली कु.आरोही व कु.अन्वी, बहिण,सासु सासरे व आप्तेष्ट यांचा सिंहाचा वाटा आहे. ह.भ.प.प्रा.डॉ. उदय चंद्रकांत पाटकर हे नारदीय कीर्तनकार, सुप्रसिद्ध प्रवचनकार, उत्कृष्ट निवेदक, सुत्रसंचालक, लेखक, व्याखाने, उत्तम वक्ते, मुलाखतकार म्हणून सर्वदुर परिचित आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!