फुलवळ येथे शालेय समिती अध्यक्षपदी मंगेश पांचाळ,उपाध्यक्ष साईनाथ बोरगावे यांची बिनविरोध निवड.

0 59

 

कंधार,दि 12 (प्रतिनिधी)ः
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे शालेय समितीच्या एकूण आठ सदस्य मधून अध्यक्षाची व उपाध्यक्ष ची निवड बिनविरोध करण्यात आली. शालेय समितीच्या अध्यक्षपदी मंगेश पांचाळ व उपाध्यक्षपदी साईनाथ बोरगावे आणि शिक्षणतज्ञ म्हणून अँड.उमर शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यामध्ये सदस्य म्हणून शिवकांता मंगनाळे, रूखसत शेख, शहाजान शेख, अनुसया बसवंते, महेंद्र गोधने, यादव पवार, यांची निवड करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक बालाजी केंद्रे सर निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी शिक्षक कामन मंगनाळे, कपाळे सर,साबदे सर अनिता मॅडम, पुराणिक मॅडम, गवळे मॅडम, हांडे मॅडम,यांची उपस्थिती होती. यावेळी गावातील प्रवीण मंगनाळे , पत्रकार मधुकर डांगे, हिराकांत मंगनाळे, कैलास फुलवळे, इस्माईल शेख, रामलिंग मठपती , संदीप मंगनाळे , रमेश गोधने, रब्बानी शेख, संतोष स्वामी,संतोष तेलंग, नितिन पांचाळ, मन्मथ फुलवळे,इत्यादी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या निवडीबद्दल सर्व वर्गातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

error: Content is protected !!