UPI व्यवहार 1 एप्रिलपासून महागणार;वाचा किती लागणार अतिरिक्त शुल्क

0 364

नवी दिल्ली : : मोबाईल क्रांतीनंतर देशात डिजिटल क्रांती आली. त्यामुळे जग अगदी जवळ आले. व्यवहारात तर या डिजिटल क्रांतीचा मोठा वाटा राहिला. बँकिंगची रटाळ आणि वेळखाऊ प्रक्रियेला जणू बुस्टर डोस मिळाला. आता ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी वारंवार बँकेत जाण्याची गरज उरली नाही. त्याच्या एटीएमच्या चकराही कमी झाल्या आहेत. ऑनलाइन पेमेंट मोडच्या (Online Payment Mode) वापरामुळे हे शक्य झाले आहे. डिजिटल पेमेंटचे देशात प्रचंड पीक आले आहे. गल्लीबोळातील भाजी विक्रेत्यापासून ते मोठ-मोठ्या दुकान, हॉटेलमध्ये या डिजिटल पेमेंटमुळे झटपट व्यवहार सुरु झाले. पण UPI पेमेंटसाठी आता तुमचा खिसा खाली होईल. गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pay) आणि पेटीएम (Paytm) सारख्या डिजिटल माध्यमांद्वारे 2,000 रुपयांपेक्षा अधिकचा व्यवहार केल्यास 1 एप्रिलपासून शुल्क लागणार आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) UPI ला व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीए) शुल्क लागू करण्यास सांगितले आहे. त्याच्या परिपत्रकानुसार, २००० रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल. हे शुल्क वापरकर्त्याला व्यापारी व्यवहारांसाठी भरावे लागेल.प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सद्वारे UPI पेमेंटसाठी १.१% इंटरचेंज शुल्क आकारले जाईल.

बिझनेस स्टँडर्डने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, प्रीपेड पेमेंट इंस्ट्रमेंट्स (PPI) शुल्क व्यवहारांवर लागू आहे. UPI व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क मर्चंट ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यापाऱ्यांना पेमेंट करणाऱ्या युझर्सकडून घेण्यात येईल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने (NPCI) अधिसूचनेत, या नवीन बदलाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. 30 सप्टेंबर 2023 रोजी पूर्वी हा आढावा घेण्यात येईल, असे एनपीसीआयने स्पष्ट केले आहे.

काय आहे युपीआय

UPI म्हणजे युनिफाईट पेमेंट्स इंटरफेस एक जलद पेमेंट सेवा आहे. ही सेवा मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून काही सेकंदातच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पेमेंट ट्रान्सफर करते. भारतीय राष्ट्रीय देयके मंडळाने (NPCI) ही पेमेंट पद्धत विकसीत केली आहे. व्हर्चुअल पेमेंट ॲड्रेस (VPA) या माध्यमातून बँक खात्याचा तपशील देण्याची गरज नसते. त्यामुळे ही पद्धत सुरक्षित मानण्यात येते.

७०% व्यवहार २ हजार रुपयांपेक्षा जास्त
NPCI च्या परिपत्रकातील संकेतांनुसार १ एप्रिलपासून तुम्ही UPI पेमेंट म्हणजेच गूगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या डिजिटल माध्यमातून २,००० रुपयांपेक्षा जास्त पैशांचे व्यवहार केल्यास तुमच्याकडून रुपये आकारले जातील. म्हणजे सामान्य नागरिकांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. दरम्यान, या अहवालानुसार, सुमारे ७०% UPI P2M व्यवहार हे २,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आहेत, अशा परिस्थितीत ०.५- १.१ टक्क्यांच्या व्यवहारावर शुल्क आकारले जाईल.

युपीआयद्वारे फसवणूकीचे बळी
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (UPI) १२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार झाले असून यादरम्यान 95 हजारांहून अधिक लोक फसवणुकीचे बळी ठरले आहेत. अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने संसदेत माहिती दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून फसवणुकीच्या बळींची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. आकडेवारी दर्शवते की २०२०-२१ मध्ये ७७,००० लोक आणि २०२१-२२ मध्ये ८४ हजार लोक युपीआय व्यवहारादरम्यान फसवणुकीला बळी पडले.

error: Content is protected !!