अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रतापराव काळे यांचे स्वागत

0 120

सेलू, प्रतिनिधी – नुकताच पदभार घेतलेले परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रतापराव काळे यांचे भारतीय जनता पक्षाचे डॉ ऋतुराज साडेगावकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

 

यावेळी रामप्रसाद पौळ, भीमराव आंधळे, वसंत डासाळकर, उद्धव हिवरे यांची उपस्थिती होती.

 

डॉ प्रतापराव काळे हे सेलू येथे उपजिल्हाधिकारी म्हणून होते. त्यावेळी त्यांची कुशल प्रशासक व पारदर्शी कारभार करणारे अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यांच्या काळात झालेल्या सर्व सार्वत्रिक निवडणुका त्यानी अत्यंत योग्य रित्या हाताळून शांततेत पार पाडल्या. जनसामान्यांची कामे विनाविलंब करण्याची त्यांचा चांगलाच हातखंडा होता. प्रशासकीय अधिकारी असून देखील लोकप्रतिनिधी व जनतेशी त्यांचा योग्य समनव्य होता. हे विशेष त्यांच्या या कुशल प्रशासनाचा निश्चितच परभणी जिल्यासाठी निश्चितच चांगला फायदा होणार आहे.

error: Content is protected !!