प्रसिध्दीसाठी नव्हे तर सामाजिक कामांसाठी पदांचा वापर करा- आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे

0 29

परभणी,दि 20 ः (प्रतिनिधी) :-
कोणतंही पद मिळवणे सोपे आहे. मात्र, त्या पदाची कर्तव्य लक्षात घेऊन जो काम करतो, त्याचीच नोंद इतिहासात होत असते. त्यामुळे लोकांच्या हिताकडे लक्ष द्या. परिसराचा कायापालट करण्यासाठी सामाजिक काम उभे करा. लोकांना भेटा. त्यांच्याशी आपुलकीने बोला. त्यातून आपला जनाधार वाढेल. त्यामुळे मिळालेल्या पदांचा वापर केवळ प्रसिध्दीसाठी नव्हे तर सामाजिक कामांसाठी करा, असा कानमंत्र गंगाखेड विधानसभेचे आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित पदधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

शहरातील राम सीता सदन येथे संपन्न झालेल्या बैठकीत आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या विविध पदांसाठी पदधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बॅक संचालक गणेशराव दादा रोकडे, माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराव निर्दूडे,माजी जि.प.सदस्य किशनराव भोसले, माजी सभापती मुंजाराम मुंढे, रासप जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंढे, पालम तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, माजी सभापती मगर पोले, साहेबराव शिंदे, शिवाजी पवार,माजी पंचायत समिती सदस्य नितीन बडे,लक्ष्मणराव मुंढे, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, राजू खान, नंदकुमार पटेल, सरपंच संभाजी पोले, वैजनाथ टोले, शेषेराव सलगर, राहूल बानाटे, इक्बाल चाऊस, राजेभाऊ बापू सातपुते, सरपंच प्रदिप शिंदे, बालासाहेब शिंदे, सतीश घोबाळे, इंतेसार सिद्दिकी, खालेद भाई, संजय पारवे, महेश शेटे, ब्रिजेश गोरे, एकनाथ गेजगे, उद्धव चोरघडे, प्रभाकर जाधव, विनायक कदम, संभुदेव मुंढे, उद्धव शिंदे, बालासाहेब भोसले यांच्या सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी  मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रल्हाद मुरकुटे, गंगाखेड तालुकाध्यक्ष म्हणून रामप्रसाद सातपुते, गंगाखेड शहर कार्याध्यक्ष म्हणून इकबाल चाऊस तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या गंगाखेड शहर अध्यक्ष धनंजय भेंडेकर आणि पालम तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मित्रमंडळासह राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राबल्य आणि बळ निश्चितच वाढले आहे.

कार्यक्रमाचे औचित्य साधून रासप प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव रोकडे, किशनराव भोसले, प्रल्हाद मुरकुटे, रामप्रसाद सातपुते, इकबाल चाऊस, नंदकुमार पटेल यांनीही मनोगते व्यक्त केली.

पुढे बोलताना आ.डाॅ.गुटटे म्हणाले की, आपला परिवार दिवसेंदिवस वाढतो आहे. चांगल्या कामामुळे लोक आपल्याकडे येत आहेत. त्याचा परिणाम आगामी निवडणुकीवर नक्कीच होणार आहे. आपला वाढलेला जनाधार मतांमध्ये रूपातंरित करण्यासाठी आपण आपल्या कामात सातत्य ठेवलं पाहिजे. मतदार संघातील प्रत्येक गावात आपली शाखा आणि कार्यकर्ते असायला हवेत, यासाठी सामूहिक प्रयत्न करा. वेळोवेळी बैठका घ्या. लोकांना भेटा. त्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घ्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.संदीप आळनुरे तर आभार शिवाजीराव निर्दूडे यांनी व्यक्त केले.

 

सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार – प्रल्हाद मुरकुटे
माझा मित्रमंडळात प्रवेश होऊन केवळ १५ दिवस झाले आहेत. तरीही साहेबांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेऊन थेट जिल्हाध्यक्ष पदाची खूप मोठी जबाबदारी दिली आहे. आणि त्या निवडीला सगळ्यांनी एकमताने संमती दिली आहे. हि बाब माझ्यासाठी फारचं आनंदाची आहे. त्यामुळे इथून पुढे काम करताना सगळ्या पदधिका-यांना विश्वासात घेऊनचं काम करणार आहे. तसेच ‘गाव तेथे शाखा‘ हाही उपक्रम आम्ही हाती घेणार आहोत. साहेबांनी टाकलेला विश्वासास कधीही तडा जाऊ देणार नाही.

जुने आणि नवे एकत्र येऊ – रामप्रसाद सातपुते

आम्ही मित्रमंडळात नुकताच प्रवेश केला आहे. मात्र, जुन्या प्रामाणिक व विश्वासू पदधिकाऱ्यांनी हा परिवार वाढवला आहे. त्यामुळे आम्ही जुन्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही कार्यक्रम किंवा उपक्रम राबविणार नाहीत. त्यामुळे जुने आणि नवे एकत्र येऊन आ. गुट्टे साहेबांची ताकत वढवूयात.

error: Content is protected !!