शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे लसीकरण शिबिर संपन्न

0 473

परभणी, प्रतिनिधी – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे दिनांक 21/01/2022 रोजी covid-19 च्या अनुषंगाने महानगरपालिका परभणी यांचे मार्फत लसीकरण शिबिर घेण्यात आले. यावेळी संस्थेतील 15 ते 18 वयोगटांमधील तसेच 18 वर्षाच्या पुढील मुले व मुली असे एकूण 267 प्रशिक्षणार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या पूर्वीदेखील संस्थेत ऑक्टोबर 20 21 मध्ये 18 वर्षा पुढील प्रशिक्षणार्थींचे व कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यासाठी शिबिर घेण्यात आले होते. प्रशिक्षणार्थ्यांचे समुपदेशनाच्या माध्यमातून लसीकरणाचे महत्व पटवून देऊन 100% लसीकरण करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

संस्थेचे प्राचार्य श्री. सूर्यवंशी एस.व्ही. यांचे मार्गदर्शनानुसार व योग्य नियोजनानुसार संस्थेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेतील गट निदेशक श्री. मोहिते  जे.डी. श्री. मोरे  डी एन. श्री. भातलवंडे एस.जी. श्री. वाघमारे आर.बी. व श्री. जगाडे ए.एम.(संस्थेचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम प्रमुख) तसेच संस्थेतील सर्व नियमित निदेशक, तासिका निदेशक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. योग्य नियोजन करून covid-19 च्या नियमांचे पालन करून लसीकरण शिबिर यशस्वीपणे पार पाडले.

error: Content is protected !!