पाथरीत नगरपालीकेच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमीत्त विविध स्पर्धा

0 46

रमेश बिजुले
पाथरी,दि 15 ः
 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्‍य साधून, स्‍वच्‍छ सर्वेक्षण -२०२३ व माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत नगर परिषद,पाथरीच्या वतीने शहरात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

१) पाच किलोमीटर मॅरेथॉन – दिनांक ०५/०८/२०२२ रोजी सकाळी ठीक ७.०० वाजता स्पर्धेला जिल्हा परिषद प्रशाला पाथरी येथून सुरुवात करुन .. मॅरेथॉन मार्ग- जिल्हा परिषद प्रशाला पाथरी – राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय – बस स्टॅन्ड- पोखर्णी फाटा – कृषी महाविद्यालय – कॅनल वरील गणपती(पाठाचा गणपती) मंदिर पर्यंत होता. सदरील स्‍पर्धे मध्‍ये नगर परिषद हद्दीतील शालेय विद्यार्थींनी सहभाग नोंदविला होता.
२) निबंध स्पर्धा- १०/०८/२०२२ रोजी महात्मा फुले मंगल कार्यालय पाथरी येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात नगर परिषद हद्दीतील शालेय विद्यार्थींनी सहभाग नोंदविला होता
३) रांगोळी स्पर्धा- १२/०८/२०२२ रोजी महात्मा फुले मंगल कार्यालय पाथरी येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या उपक्रमात नगर परिषद हद्दीतील शालेय विद्यार्थींनी सहभाग नोंदविला होता.
वरील विविध स्‍पर्धेच्‍या अनुषंगाने आज दिनांक १५ ऑगस्‍ट, २०२२ ७५ व्‍या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्‍य वरील विविध स्‍पर्धेत विजेते विद्यार्थ्‍यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मा.उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथरी येथे आयोजीत करण्‍यात आलेला होता. याप्रसंगी कार्यक्रमासाठी उपस्थित श्री. शैलेश लाहोटी, उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद पाथरी, श्रीमती सुमन मोरे तहसीलदार पाथरी, श्री खरात गट विकास अधिकारी पंचायत समिती पाथरी, श्रीमती. कोमल सावरे, मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी, वन अधिकारी श्री पांडुरंग कोल्‍हे, तसेच नगर परिषद पाथरीचे कार्यालयीन अधीक्षक श्री बी.यु.भाले, प्रशासकीय अधिकारी श्री राघवेंद्र विश्वामित्रे, श्री किशोर भिसे, श्री मुकुंद दिवाण, श्री संतोष हुले, श्री शेख मुस्तफा, श्री ज्ञानेश्‍वर घोळवे, श्री अशोक पारवे आणि तालुक्यातील शाळेचे क्रीडाशिक्षक श्री शेळके सर, श्री शिवराज नाईक, प्राचार्य श्री के.एन.डहाळे, श्री गायकवाड सर व सर्व शालेय विद्यार्थी, शिक्षक वर्ग, शहरातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!