वात्सल्यमुर्ती : गीता मावशी

0 120

 

सुरुवात कुठून करू तेच मला कळत नाही कारण गीता मावशी विषयी जेवढं बोलावं तेवढं कमीचआहे. मावशी या नात्याचे महत्व अगाध आहे. आई नंतर हेच नातं आपल्या अधिक जवळ असतं.जवळीकता निर्माण करत….आपल्या आयुष्यातील आई नसण्याचे रितेपन मावशी नावाचे व्यासपीठ भरून काढते. मावशीचं आणि लेकीचं नातं म्हणजे माय-लेकीचंच नातं होय. गीता मावशी म्हणजे
माझ्या आईनंतरची माझी आईच म्हणावे लागेल. माझ्या आयुष्यातील आईचे रितेपण मावशी यानात्याने भरून काढले. मावशी या शब्दाची सुरुवातच मा या आद्यक्षराने होते. म्हणूनच जगात आईनंतर सर्वाधिक प्रेम करणारी व्यक्ती ही मावशी असते हे अत्यंत खर आहे. असं म्हटलं जातकी माय मरो आणि मावशी जगो; या उक्तीप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये ही झालं. आई
गेल्यानंतर मला जे प्रेम देणारी, जीव लावणारी माझी मावशी होय. अत्यंत प्रेमळ स्वभावअसणाऱ्या गीता मावशी आज आमच्यातून निघून गेल्याने अत्यंत दुःख झाले आहे. मला असवाटत कि मी परत एकदा पोरकी झाली आहे.माणसाने माणूसपण कसे जपावे याचा परिपूर्ण पाठ म्हणजे गीता मावशी होय. प्रेमळ,मायाळू, जीव लावणाऱ्या, प्रत्येकाला आपलंसं करणाऱ्या आणि ईश्वर भक्ती, नामस्मरणामध्येनित्त्याने रममान होणाऱ्या आमच्या गीता मावशी. हे व्यक्तिमत्व सतत आमच्या गोतावळ्यातील प्रत्येकाला प्रेरणादायी आणि आकर्षक वाटायचं. त्या आज आमच्यात नसल्यातरी माझ्यासोबत असल्याचा भास नेहमी होतो. मावशींच्या दिनचर्येची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने व्हायची आणिशेवटही नामस्मरणाने. सात्विक, सोज्वळ, निरपेक्षभावे जगून आचरण करणाऱ्या आमच्या लाडक्यागीता मावशी म्हणजेच गीताबाई शेषराव पांगरकर….

पाहुणचार कसा करावा हे आम्ही गीता मावशीकडून शिकलो. कोणताही पाहुणा घरी आला तर काही ना काही खाऊन वापस गेला पाहिजे असा संस्कार मावशीने आयुष्यभर जपला आणि तो पुढच्या पिढीला दिला. बोलण्यासह वागण्यातून आदर्श घालून देण्याचं काम आयुष्यभर मावशीनेकेले. समकाळात अशा प्रकारचे आदर्श व्यक्तिमत्व क्वचितच आपल्याला पाहायला मिळतात.
आयुष्यातील कोणत्याही संकटांना हसतमुखाने सामोरे जात ती संकटे पार करण्याची क्षमता मावशीमध्ये होती. बोलका स्वभाव आणि आनंदी राहणे हा त्यांचा स्थायीभाव म्हणावा लागेल.मुलांसाठी त्या बाई, बहिणीसाठी लाडक्या जीजी आणि आमच्यासाठी त्या लाडक्या मावशीहोत्या. त्यांचा एक सुखद किस्सा मला इथे आठवतो. मागच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी रंगनाथगुरुजींच्या स्मृतीस्थळाहून (ब्राह्मणगाव) मला फोन केला आणि म्हणाल्या की मी आता ब्राह्मणगावला आहे आणि मला तुला बघावस वाटत आहे, त्यामुळे मी तुझ्या घरी येत आहे.’

अनपेक्षितपणे मावशीने केलेला फोन मला सुखावून गेला. मावशी सोबत सुमन मावशी आणिमोठ्या मावशी या सगळ्याच माझ्या घरी आल्या. त्यादिवशी माझा आनंद गगनात मावेनासाझाला. विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. फक्त कमी होती ती माझ्या आईची. मला त्यांच्यारूपाने साक्षात घरी गुरु आल्यासारखे वाटले. ही अनुभूती अवर्णनीय होती. आज ही ती माझ्या स्मृतींना सुखावून जाते. मग काय रात्री उशिरापर्यंत मावशीसोबत गप्पा रंगल्या. मावशींकडे आई विषयी खूप छान आठवणी होत्या. त्या मला त्यांनी सांगितल्या. त्यादिवशी मावशीने घरी येऊन घराविषयी, माझ्याविषयी, माझ्या परिवाराविषयी आनंद व्यक्त केला. मावशीच्या मायेच्या
ओलाव्याने माझं मन तृप्त झालं. तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. खरंच आपल्या आयुष्यात मावशी हा धागा किती नाजूक आणि महत्त्वाचा असतो हे मला मावशींच्या नात्यातून कळलं.
नवरा बायकोचं नातं कस असाव याचं आदर्श उदाहरण काका आणि मावशी यांचं नात होय. या दांपत्याकडे बघितले की प्रत्येकाला हेवा वाटायचा. मातृतुल्य मावशीने सगळी नाती चोखपणे आणि आनंदी वातावरणात निभावली. एक उत्तम पत्नी, आई, बहीण, आजी,
पणजी,मावशी सुद्धा. या आणि अशा प्रकारची अनेक कर्तव्य प्रत्येक स्त्रीला निभावता येतीलच असं नाही. सुखी संसार करताना ही खूप बारकाईने त्यांनी संसार केला. तो वसा अनेक स्त्रियांना दिशादर्शक आहे. मुलं, सुना, नातवांमध्ये रममाण झालेल्या मावशी कुटुंबवत्सल तर होत्याच परंतु त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या स्त्रियांना सुद्धा जीव लावून त्या आपलसं
करायच्या. जेंव्हा जेंव्हा मी त्यांना भेटले तेंव्हा तेंव्हा मला त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी सहानुभूती, प्रेम आणि अतूट आपुलकी दिसली. आपल्यासारखी सहनशीलता, धैर्यशीलता आणि समर्थपणे वागण्या-बोलण्याची ताकद मला मिळावी अशी ईश्वरचरणी अपेक्षा. नातं कसं जपावं याचा संपूर्ण परिपाठ म्हणजे मावशी होय. घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याला जेवण केल्याशिवाय
जाऊ द्यायचे नाही हा त्यांचा स्वभाव त्यामुळे त्यांना परिपूर्ण अन्नपूर्णा म्हटले तरी वावग ठरणार नाही.

कुटुंबात सर्व काही छान चालू असतानाच काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर आजारांची संकट ओढवल गेल. हृदयविकाराचा आजार जडला. हृदयविकाराच्या आजाराने त्या खचल्या नाहीत. आनंदानेसंकटांचा सामना करून त्यावर मात केली. त्या सतत म्हणायच्या ‘सद्गुरु पाठीशी असतानाआपण कशाला भीती बाळगायची ते सर्व काही ठीक करतील.’ यावरून त्यांचा सदगुरुंच्या प्रति किती विश्वास होता हे दिसून येते. परंतु एक संकट निवळत असतानाच दुसरे संकट उभे राहिलेते म्हणजे कॅन्सर आजाराचे. यावरही त्या खचल्या नाहीत. त्यांनी मानसिक आणि शारिरीकरित्या होईल तेवढ उपचाराला साथ दिली. त्याच्यावरही मात केली. परंतु शेवटी शरीर ते शरीरच असत.ते किती सहन करेल हा एक प्रश्नच आहे. अशा दुर्धर आजाराशी लढताना २५ ऑगस्ट २०२२ रोजीत्यांची प्राणज्योत मालवली. हा दिवस माझ्यासाठीच नाही तर त्यांच्या वलयातील सर्वांना अत्यंत दुःखद होता. जाताना त्या म्हणाल्या माझ्या जाण्याने कोणीही रडू नका तर दिवाळी साजरी करा.हा आधुनिक विचार मावशींनी सर्वाना दिला. शेवटपर्यंत सदगुरुंचे नामस्मरण करणे, जप, पोथीवाचणे थांबले नाही. पूजनीय रंगनाथ काळदाते गुरुजींवर अपार भक्ती त्यांनी केली. शेवटच्याश्वासापर्यंत दिगंबरा- दिगंबरा जप करत राहिल्या. अध्यात्मिक शक्ती माणसाला जगण्याला आणिसंकटांना सामोरे जाण्यासाठी बळ देते याची प्रचिती मावशी वरून मला आली. त्यांच्या आजारपणामध्ये मी त्यांच्याजवळ जास्त राहू शकले नाही, त्यांची सेवा करू शकले नाही याची मला खंत नेहमीच राहणार आहे. मावशी तुम्ही गेलात पण माझ्याजवळ तुम्ही अजूनही आहात असं मला नेहमी वाटत असतं. तुमचा तो हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये.अजूनही प्रेमाची हाक आपल्याकडून येते असं मला नेहमी वाटतं. तुमच्यासारख वागणं-बोलणं,नात्यातला गोडवा आणि जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. तुम्ही जरी गेला असाल तरी तुम्ही माझ्या जवळपासच आहात असं मला नेहमी वाटतं असत. आईची जागा आणि मावशीची माया कोणीही कमी करू शकत नाही हे ही सत्यच आहे. सगळ्या मावशांमध्ये आपण माझ्यासाठी स्पेशल होतात. सुमन मावशी, सखू मावशी, मोठ्या मावशी या सगळ्यांसोबतच आपले स्थानही माझ्या मनामध्ये आदराचे आहे. तुमच्याबद्दल जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे.

शब्द अपुरी पडत आहेत. तुमच्या विना मायेचा झरा अपूर्ण आहे तो कधीही पूर्ण होऊ शकत नाही हे मात्र नक्की… मातृतुल्य आणि तीर्थरूप गीता मावशींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन…..आपल्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना….
सौ.श्रेया जयंत बोबडे
                                                                                                                                                     परभणी
                               

error: Content is protected !!