कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी बैलगाडीतून प्रवास करत गाठले शिवार

0 383

परभणी,दि 08 ःवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपुर्ण मराठवाडयातील ६० पेक्षा जास्‍त गावात राबविण्‍यात आला ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमात कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी बैलगाडीतून शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम राबविण्यात येत असुन उपक्रमांतर्गत दिनांक ८ नोव्‍हेंबर रोजी एकाच दिवशी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ संपुर्ण मराठवाडयातील ६० पेक्षा जास्‍त गावात जाऊन शेतकरी बांधवाशी संवाद साधला. यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांची २५ पथके तयार करण्‍यात आली होती, यात १२५ पेक्षा शास्‍त्रज्ञांचा समावेश होता. संपुर्ण दिवसात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतकरी बांधवाशी संवाद साधुन त्‍यांच्‍या कृषि विषयक समस्‍या जाणुन घेऊन शेतकरी बांधवाच्‍या शेतीस भेट देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात आले. सदरिल उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ इन्‍द्र मणि हे मानवत तालुक्‍यातील मौजे मंगरूळ येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर भेट देऊन संवाद साधला.यावेळी त्यांनी आपल्या चारचाकी ऐवजी बैलगाडीतून प्रवास केला.
या उपक्रमास शेतकरी बांधवाचा उस्‍फुर्त्‍य प्रतिसाद दिला.
सदर उपक्रमांची सुरूवात दिनांक १ सप्‍टेबर रोजी करण्‍यात आली असुन दिनांक १ सप्‍टेंबर रोजी संपूर्ण मराठवाड्यात ८० विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २२ पथकांनी ६० गावांत तर दिनांक ३ ऑक्‍टोबर रोजी ११५ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २७ पथकांनी ६४ गावांत भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांच्‍या शेती विषयी तांत्रिक समस्याचे समाधान करण्यात आले. सदरिल उपक्रम कृषि विभागाच्‍या सहकार्यांने राबविण्यात येत आहे.

error: Content is protected !!