Vodafone-Idea : नोव्हेंबरपासून व्होडाफोन आयडियाचे नेटवर्क होऊ शकते बंद ? 25.5 कोटी ग्राहकांच्या वाढणार अडचणी

0 88

नवी दिल्ली – कर्जबाजारी दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडियाच्या (Vodafone-Idea) 25.5 कोटी ग्राहकांच्या अडचणी वाढू शकतात. नोव्हेंबरपासून कंपनीचे नेटवर्क बंद होऊ शकते. व्होडाफोन आयडियाकडे इंडस टॉवर्सचे सुमारे ७,००० कोटी रुपये थकीत आहेत. कंपनीने लवकरात लवकर थकबाकी भरली नाही तर नोव्हेंबरपासून टॉवर्समध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी धमकी इंडस टॉवर्सने दिली आहे. म्हणजेच व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांसाठी नेटवर्क बंद होणार आहे.

 

dr. kendrekar

सूत्रांच्या हवाल्याने ईटीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. टॉवर कंपनी इंडस टॉवर्सने सोमवारी व्होडाफोन आयडियाला पत्र लिहून हा इशारा दिला आहे. सोमवारीच इंडस टॉवर्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात कंपनीच्या आर्थिक स्थितीवर चर्चा झाली. इंडस टॉवर्सवर व्होडाफोन आयडियाचे सुमारे ७,००० कोटी रुपये थकीत आहेत. रिलायन्स जिओ आणि एअरटेल नंतर व्होडाफोन आयडिया ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. मात्र कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नसून तिच्यावर प्रचंड कर्जाचा डोंगर आहे.

 

इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, व्होडाफोन आयडियाकडे इंडस टॉवर्सचे सुमारे 7,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. अनेक दिवसांपासून व्होडा आयडिया ही थकबाकी भरण्यास टाळाटाळ करत आहे. आता इंडस टॉवर्सने अंतिम इशारा दिला असून ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण रक्कम भरण्यास सांगितलं आहे. तसे न झाल्यास नोव्हेंबरपासून टॉवर सेवा बंद करण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. या आठवड्यात सोमवारी इंडस टॉवर्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात कंपनीच्या आर्थिक स्थितीवर चर्चा झाली. यानंतर इंडस टॉवर्सने व्होडाफोन आयडियाला 7,000 कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी पत्र लिहिले आहे.

error: Content is protected !!